व्हिडिओ पाहण्यासाठी

डावीकडून उजवीकडे: भाऊ रोमन मरेयेव्ह; भाऊ ॲनातोली मारूनोव्ह; भाऊ सर्गेई तोलोकोनिकोव्ह आणि त्यांची पत्नी मारिया

१० फेब्रुवारी २०२३ | अपडेट: १४ जुलै, २०२३
रशिया

अपडेट—भावांना तुरुंगवास | मॉस्कोच्या न्यायालयात तीन भावांवर खटला

अपडेट—भावांना तुरुंगवास | मॉस्कोच्या न्यायालयात तीन भावांवर खटला

१२ जुलै २०२३ रोजी, मॉस्कोच्या सॅवेलोव्स्की जिल्हा न्यायालयाने भाऊ रोमन मरेयेव्ह, ॲनातोली मारूनोव्ह आणि सर्गेई तोलोकोनिकोव्ह यांना दोषी ठरवलं. त्यांना अनुक्रमे चार वर्षं आणि सहा महिने, सहा वर्षं आणि सहा महिने आणि पाच वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ॲनातोली यांना कोर्टातून लगेचच ताब्यात घेण्यात आलं. भाऊ रोमन आणि सर्गेई हे आधीपासूनच कैदेत होते.

थोडक्यात माहिती

रोमन, ॲनातोली आणि सर्गेई यांनी विश्‍वासाचं जे जिवंत उदाहरण आपल्यासमोर मांडलंय त्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत. आपल्याला खातरी आहे, की कितीही कठीण परिस्थिती आली, तरी यहोवा आपल्यासोबत असल्यामुळे आपल्याला “कशाचीही भीती” वाटणार नाही.—स्तोत्र २३:४.

घटनाक्रम

  1. २० ऑक्टोबर, २०२१

    अधिकाऱ्‍यांनी मॉस्कोतल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या आठ घरांवर छापे टाकले. रोमन, ॲनातोली आणि सर्गेई यांच्यावर देशाला धोका असणाऱ्‍या संघटनेच्या कार्यांचं आयोजन केल्याच्या आणि इतरांना त्या कार्यांत भाग घ्यायला प्रवृत्त केल्याच्या खोट्या आरोपांखाली फौजदारी खटला चालवण्यात आला. या तिन्ही भावांना तात्पुरत्या कैदेत ठेवण्यात आलं आहे

  2. २२ ऑक्टोबर, २०२१

    रोमन आणि सर्गेई यांना सुनावणीपूर्व कैदेत पाठवण्यात आलं आणि ॲनातोली यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं

  3. १७ जून, २०२२

    फौजदारी खटला सुरू झाला

a हा लेख तयार केला जात असताना भाऊ तोलोकोनिकोव्ह सुनावणीपूर्व कैदेत होते आणि त्यामुळे त्यांचं व्यक्‍तिगत मत मिळवता आलं नाही. बहीण पॅनकोव्हा यांनी लग्नानंतरही आपलं माहेरचं नाव ठेवलं आहे.