व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मिलफोर्ड साऊंड

देश आणि लोक

न्यूझीलंडला भेट

न्यूझीलंडला भेट

जवळजवळ ८०० वर्षांपूर्वी माओरी जमातीचे लोक, हजारो मैलांचा समुद्री प्रवास करून एका भूप्रदेशात येऊन पोचले. तो भूप्रदेश होता न्यूझीलंड. माओरी लोक तिथेच स्थायिक झाले. हा भूप्रदेश ते आधी राहत असलेल्या पॉलिनेशिया या उष्ण प्रदेशापेक्षा अगदी वेगळा होता. या प्रदेशात पर्वत, हिमनद्या, बर्फ आणि गरम पाण्याचे झरे होते. मग, जवळजवळ पाच शतकांनंतर आणखी एका जमातीचे लोक दूर युरोपमधून तिथे स्थायी होण्यासाठी आले. आज न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्‍या बऱ्‍याच जणांनी पॉलिनेशियन आणि अँग्लोसॅक्सन म्हणजे जर्मन कुळातल्या लोकांची संस्कृती स्वीकारली आहे. न्यूझीलंडमध्ये जवळजवळ ९० टक्के लोक शहरात राहतात. वेलिंग्टन शहर हे न्यूझीलंडची राजधानी आहे. या राजधानीचं वैशिष्ट्य म्हणजे, ही जगात अगदी दक्षिणेकडे असलेली राजधानी आहे.

उत्तर बेटात असलेली उकळणाऱ्‍या चिखलाची डबकी

न्यूझीलंडमधले निसर्गाचे देखावे खूप भिन्‍न आणि लक्ष वेधून घेणारे असे आहेत. आणि म्हणूनच ही गोष्ट आश्‍चर्य करण्यासारखी नाही, की न्यूझीलंड या दुर्गम देशात दरवर्षी जवळजवळ ३० लाख पर्यटक येतात.

चंदेरी नेच्याचं झाड ३० फूट (१० मी.) पेक्षाही जास्त उंच वाढू शकतं

उडता न येणारा टकाहे पक्षी लुप्त झाल्याचं १९४८ पर्यंत मानलं जायचं

न्यूझीलंडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे अनेक निरनिराळे वन्यजीव आहेत. त्यांच्यातला एक म्हणजे पालीसारखा सरपटणारा ट्यूटारा. हा प्राणी १०० वर्षांपर्यंत जगू शकतो! तसंच, उडता न येणाऱ्‍या पक्षांच्या सर्वात जास्त जाती इथे आहेत. इथे काही स्थानिक सस्तन प्राणीसुद्धा आहेत. जसं की, वटवाघळाच्या काही जाती आणि देवमासा व डॉल्फीन यांसारखे समुद्रातले काही मोठे मासे.

यहोवाचे साक्षीदार न्यूझीलंडमध्ये जवळपास १२० वर्षांपासून सेवा करत आहेत. ते जवळजवळ १९ भाषांमध्ये बायबल शिकवतात. त्या भाषांमध्ये काही पॉलिनेशियाच्या भाषांचाही समावेश होतो. जसं की नियुअॅन, रारोटाँगन, सामोअन आणि टॉनगन. ▪

पारंपरिक पोशाखात माओरी लोक एका गाण्यावर नृत्य सादर करताना