व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपला प्रेमळ सृष्टिकर्ता आपली काळजी घेतो

आपला प्रेमळ सृष्टिकर्ता आपली काळजी घेतो

१. आपला सृष्टीकर्ता आपल्याला सूर्यप्रकाश देतो

सूर्यापासून मिळणाऱ्‍या उर्जेमुळे झाडांना पालवी फुटते, फुलं येतात आणि फळं लागतात. सूर्याच्या उर्जेमुळे झाडांची मुळं जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि ते पानांपर्यंत पोचवतात, आणि नंतर त्याचं बाष्पीभवन होतं.

२. आपला सृष्टिकर्ता आपल्यासाठी पाऊस पाडतो

पाऊससुद्धा देवाकडून आपल्याला मिळालेली एक मौल्यवान देणगी आहे. पावसामुळे पृथ्वीवर अन्‍नधान्य उगवतं. पावसासोबतच देव आपल्याला वेगवेगळे ऋतूही देतो. त्या ऋतूंमुळे आपल्याला वेगवेगळ्या फळांचा आणि भाज्यांचा आस्वाद घ्यायला मिळतो आणि आपलं मन प्रसन्‍न राहतं.

३. आपला सृष्टिकर्ता आपल्याला अन्‍न आणि वस्त्र पुरवतो

एका वडिलाला सहसा आपल्या कुटुंबाला अन्‍न आणि वस्त्र पुरवण्याची काळजी असते. अगदी त्याचप्रकारे आपल्या सृष्टिकर्त्यालाही आपली काळजी आहे. त्याच्याबद्दल पवित्र शास्त्र म्हणतं: “आकाशातल्या पक्ष्यांकडे लक्ष द्या; ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा कोठारांत धान्य साठवत नाहीत; तरीही तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खाऊ घालतो. तुमचं मोल त्यांच्यापेक्षा जास्त नाही का?”—मत्तय ६:२५, २६.

“रानातल्या फुलांकडून धडा घ्या, ती कशी वाढतात; . . . पण मी तुम्हाला सांगतो, की [राजा] शलमोननेसुद्धा आपल्या सर्व वैभवात या फुलांसारखा सुंदर पेहराव केला नव्हता. रानातली झाडंझुडपं . . . त्यांना जर देव इतकं सुंदर सजवतो, तर . . . तो तुम्हाला घालायला कपडे देणार नाही का?”—मत्तय ६:२८-३०.

देव जर आपल्याला अन्‍न आणि वस्त्र पुरवू शकतो, तर तो नक्कीच आपल्या इतर गरजाही पूर्ण करू शकतो. आपण जर देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला, तर रोजच्या गरजा भागवण्यासाठी आपण जी काही मेहनत करू त्यावर तो आशीर्वाद देईल.—मत्तय ६:३२, ३३.

खरंच, आपण जेव्हा सूर्य, पाऊस, पक्षी आणि फुलं या सगळ्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात देवाविषयी प्रेम दाटून येतं. आता पुढच्या लेखात आपण हे पाहू की आपला सृष्टीकर्ता मानवांशी पूर्वी कसा बोलला.