व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलमधले वाक्यांश

तुमच्यामध्ये विश्‍वास आहे का?

तुमच्यामध्ये विश्‍वास आहे का?

यहोवाला खूश करायला आपल्याजवळ विश्‍वास असला पाहिजे. पण बायबल म्हणतं: “सर्वांजवळच विश्‍वास असतो असं नाही.” (२ थेस्सलनी. ३:२) प्रेषित पौल त्याचा छळ करणाऱ्‍या “वाईट व दुष्ट” माणसांना उद्देशून हे बोलला. पण विश्‍वासाबद्दल तो जे बोलला ते इतरांनाही लागू होतं. काही लोक, स्पष्ट पुरावे असूनपण निर्माणकर्त्या देवाचं अस्तित्व नाकारतात. (रोम. १:२०) तर इतर काही जण आपल्यापेक्षा जास्त शक्‍तिशाली या विश्‍वात काहीतरी असलं पाहिजे म्हणून देवाला मानतात. पण यहोवाला खूश करायचं असेल तर फक्‍त इतकंच मानणं पुरेसं नाही.

यहोवा अस्तित्वात आहे आणि त्याच्यावर मजबूत विश्‍वास ठेवणाऱ्‍याला तो “प्रतिफळ” देतो, याची आपल्याला पक्की खातरी असली पाहिजे. (इब्री ११:६) विश्‍वास हा त्याच्या पवित्र शक्‍तीच्या फळांपैकी एक आहे. आणि ही पवित्र शक्‍ती मिळवण्यासाठी आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. (लूक ११:९, १०, १३) पवित्र शक्‍ती मिळवण्याचा आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे बायबल वाचणं. आपण वाचलेल्या गोष्टींवर विचार करू शकतो आणि ते लागू करायचा प्रयत्न करू शकतो. असं केल्यामुळे आपण देवाच्या पवित्र शक्‍तीला आपल्या जीवनात कार्य करू देऊ. आणि यहोवा खूश होईल असा विश्‍वास आपल्यामध्ये वाढवायला आपल्याला मदत होईल.