व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवतं का?

तुम्हाला आठवतं का?

या वर्षाचे टेहळणी बुरूज अंक तुम्ही लक्ष देऊन वाचले आहेत का? तर मग, पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला देता येतात का ते पाहा:

स्त्रियांशी वागण्याबद्दल यहोवाने कोणतं उदाहरण मांडलंय?

तो स्त्रियांना कमी आणि पुरुषांना जास्त महत्त्व देत नाही. कारण तो भेदभाव करत नाही. तो स्त्रियांचं ऐकतो. तो त्यांच्या भावना, त्यांच्या चिंता समजून घेतो. तसंच, तो भरवसा ठेवतो की त्या त्याचं काम पार पाडतील.—टेहळणी बुरूज२४.०१, पानं १५-१६.

इफिसकर ५:७ मध्ये म्हटलंय: “त्यांच्यासोबत सहभागी होऊ नका.” मग हा सल्ला आपण कसा पाळू शकतो?

प्रेषित पौलने आपल्याला सल्ला दिला होता की आपण अशा लोकांसोबत वेळ घालवू नये, ज्यांच्यामुळे आपल्याला यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगणं कठीण जाईल. आपण प्रत्यक्ष ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांच्यापुरताच हा सल्ला मर्यादित नाही, तर आपण सोशल मिडियावर ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांच्या बाबतीतही हा सल्ला लागू होतो.—टेहळणी बुरूज२४.०३, पानं २२-२३.

आपण कोणत्या प्रकारच्या खोट्या माहितीपासून सावध राहिलं पाहिजे?

आपल्याला बऱ्‍याच मार्गांनी खोटी माहिती मिळू शकते. एखाद्या भावाकडून किंवा बहिणीकडून किंवा ई-मेलद्वारे अशी माहिती मिळू शकते. किंवा, आपल्याला प्रचारात असे लोक भेटतील जे धर्मत्यागी असतात, पण ते बायबलमध्ये आवड असल्याचं दाखवतील. अशा प्रकारे मिळणाऱ्‍या खोट्या माहितीपासून आपण सावध राहिलं पाहिजे.—टेहळणी बुरूज२४.०४, पान १२.

शलमोन राजाचा, सदोम आणि गमोराच्या लोकांचा तसंच जलप्रलयात मेलेल्या लोकांचा यहोवा न्याय कसा करेल याबद्दल आपल्याला काय माहीत आहे आणि काय माहीत नाही?

यहोवा त्या लोकांचा कायमचा नाश करेल की नाही हे आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला हे माहीत आहे की तो दयाळू देव आहे आणि तो सगळ्या गोष्टी जाणतो.—टेहळणी बुरूज२४.०५, पानं ३-४.

यहोवाला बायबलमध्ये “खडक” म्हटलंय. यावरून आपल्याला कोणती खातरी मिळते? (अनु. ३२:४)

आपण यहोवाचा आश्रय घेऊ शकतो. कारण तो भरवशालायक आहे आणि तो आपल्या शब्दाला जागतो. तसंच, तो कधीही न बदलणारा देव आहे. म्हणजे त्याचं व्यक्‍तिमत्त्व आणि त्याचे उद्देश कधीच बदलत नाही.—टेहळणी बुरूज२४.०६, पानं २६-२८.

नवीन मंडळीशी जुळवून घ्यायला तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?

यहोवाने प्राचीन काळातल्या त्याच्या सेवकांना जशी मदत केली, तशीच तो तुम्हालाही मदत करेल. त्यामुळे त्याच्यावर विसंबून राहा. तसंच, आधीच्या मंडळीसोबत तुलना करू नका. नवीन मंडळीत सहभागी व्हा आणि नवीन मित्र जोडायचा प्रयत्न करा.—टेहळणी बुरूज२४.०७, पानं २६-२८.

मत्तयच्या २५ व्या अध्यायातल्या तीन दाखल्यांमधून कोणते धडे शिकायला मिळतात?

मेंढरं आणि बकऱ्‍यांच्या दाखल्यावरून आपल्याला विश्‍वासू आणि एकनिष्ठ राहायचं महत्त्व कळतं. समजदार आणि मूर्ख कुमारींच्या दाखल्यामध्ये तयार आणि सतर्क राहण्यावर जोर देण्यात आलाय. आणि तालान्तांच्या दाखल्यामध्ये मेहनती असण्याबद्दल सांगितलंय.—टेहळणी बुरूज२४.०९, पानं २०-२४.

शलमोनच्या मंदिरातल्या द्वारमंडपाची उंची किती होती?

काही जुन्या हस्तलिखितांमध्ये २ इतिहास ३:४ या वचनात द्वारमंडपाची उंची “१२०” हात दिली आहे. यावरून म्हणता येईल की द्वारमंडप ५३ मीटर (१७५ फूट) उंच होता. पण दुसऱ्‍या काही भरवशालायक लिखाणांमध्ये द्वारमंडपाची उंची “२० हात” दिली आहे. यावरून वाटू शकतं की द्वारमंडप नऊ मीटर (३० फूट) उंच होता. पण “२० हात” हे माप मंदिराच्या भिंतीच्या रुंदीचं असावं असं दिसतं.—टेहळणी बुरूज२४.१०, पान ३१.

सहायक सेवकाने “एकाच स्त्रीचा पती” असण्याचा काय अर्थ होतो? (१ तीम. ३:१२)

याचा अर्थ त्या भावाचं एकाच स्त्रीशी लग्न झालेलं असावं. आणि तो अनैतिक लैंगिक कृत्यं करत नसावा. त्यासोबतच तो इतर स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणारा नसावा.—टेहळणी बुरूज२४.११, पान १९.

योहान ६:५३ मध्ये सांगितलेली गोष्ट आपण प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी करत नाही असं आपण का म्हणू शकतो?

योहान ६:५३ मध्ये येशूचं मांस खाणं आणि त्याचं रक्‍त पिणं का गरजेचं आहे ते सांगितलंय. येशू हे शब्द इ.स. ३२ मध्ये गालीलमध्ये असताना बोलला. त्या वेळी तो अशा यहुद्यांशी बोलत होता, ज्यांचा त्याच्यावर विश्‍वास नव्हता. पण प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात त्याच्या पुढच्या वर्षी यरुशलेममध्ये करण्यात आली. त्या वेळी येशू अशा शिष्यांशी बोलत होता, जे त्याच्यासोबत स्वर्गात राज्य करणार होते.—टेहळणी बुरूज२४.१२, पानं १०-११.