विश्वास दाखवा व सुज्ञपणे निर्णय घ्या!
“काही संशय न धरता विश्वासाने” मागा.—याको. १:६.
१. काइनाने चुकीचा निर्णय का घेतला, आणि त्याचे काय परिणाम झाले?
काइनासमोर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची वेळ आली होती. तो आपल्या पापी व चुकीच्या इच्छांवर ताबा मिळवण्याची निवड करू शकत होता, किंवा मग आपल्या भावनांच्या आहारी जाण्याचं निवडू शकत होता. जर काइनाने स्वतःच्या इच्छांवर ताबा मिळवला, तर त्याचे चांगले परिणाम होणार होते. पण जर त्याने भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतला, तर त्याचे फार वाईट परिणाम घडून येणार होते. बायबल आपल्याला सांगतं की काइनाने चुकीचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या भावाला, हाबेलाला आपला प्राण गमवावा लागला. तसंच, काइनाने यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंधदेखील गमावला.—उत्प. ४:३-१६.
२. चांगले निर्णय घेणं का गरजेचं आहे?
२ काइनाप्रमाणेच आपल्या प्रत्येकाला जीवनात निवड करावी लागते आणि अनेक निर्णय घ्यावे लागतात. सगळेच निर्णय हे फार गंभीर स्वरूपाचे नसतात. पण तरी आपण घेतलेल्या बऱ्याच निर्णयांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. जेव्हा आपण चांगले निर्णय घेतो, तेव्हा आपल्या जीवनात शांती राहू शकते आणि आपल्याला कदाचित कमी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पण जेव्हा आपण काही चुकीचे निर्णय घेतो, तेव्हा आपल्याला निराशेचा आणि बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो.—नीति. १४:८.
३. (क) चांगले निर्णय घेता यावेत यासाठी आपल्याला काय भरवसा बाळगण्याची गरज आहे? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
याकोब १:५-८ वाचा.) जसजसं आपण यहोवाच्या वचनांवर अधिकाधिक प्रेम करू आणि त्याच्या जवळ जाऊ, तसतसं आपल्याला हा भरवसा बाळगण्यास मदत होईल की आपल्यासाठी काय योग्य आहे हे तो चांगल्या प्रकारे जाणतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी आपण त्याच्या वचनांचं परीक्षण करू. पण, योग्य निर्णय घेता यावेत यासाठी, आपण आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेत आणखी सुधारणा कशी करू शकतो? आणि आपण घेतलेले निर्णय आपण बदलू शकतो का?
३ आपल्याला सुज्ञपणे निर्णय घेण्यासाठी कशामुळे मदत होईल? यासाठी आपल्याला देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आपल्याला मदत करण्याची त्याची इच्छा आहे आणि तो आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धी देईल, यावर आपण भरवसा ठेवण्याची गरज आहे. यासोबतच आपण त्याच्या वचनांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांतून तो जे सल्ले देतो त्यांवर भरवसा ठेवला पाहिजे. (आपल्या सर्वांनाच निर्णय घ्यावे लागतात
४. आदामासमोर कोणता निर्णय घेण्याची वेळ आली आणि त्याने घेतलेल्या निर्णयाचे काय परिणाम झाले?
४ मानव इतिहासाच्या सुरवातीपासूनच मानवांना महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले आहेत. पहिला मानव आदाम याचं उदाहरण घ्या. त्यालादेखील आपल्या निर्माणकर्त्याचं ऐकावं की आपल्या पत्नीचं ऐकावं याबाबतीत निर्णय घ्यावा लागला. आदामाने यहोवा देवाऐवजी त्याच्या पत्नीचं ऐकण्याची निवड केली. हव्वेने त्याला एक फार मोठा चुकीचा निर्णय घेण्यास प्रेरित केलं. याचा परिणाम म्हणजे, यहोवा देवाने आदामाला एदेन बागेतून घालवून दिलं, आणि कालांतराने आदामाला मरणही आलं. आदामाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे वाईट परिणाम आज आपल्यालादेखील भोगावे लागत आहेत.
५. निर्णय घेण्याच्या आपल्या जबाबदारीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे?
५ काही जण असा विचार करतील, की जर आपल्याला निर्णयच घ्यावे लागले नाहीत तर जीवन किती सुरळीत व सोपं होईल. कदाचित तुम्हालाही असंच वाटत असेल. पण आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की यहोवा देवाने मानवांना, विचार न करू शकणाऱ्या व स्वतःचे निर्णय स्वतः न घेऊ शकणाऱ्या, एखाद्या रोबोटप्रमाणे बनवलेलं नाही. खरंतर आपण सुज्ञपणे निर्णय कसे घेऊ शकतो हे समजण्यासाठी यहोवाने त्याचं वचन बायबल आपल्याला दिलं आहे. आपण निर्णय घ्यावेत अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो, आणि यात आपलं नुकसान नाही. पुढील काही उदाहरणांचा विचार करा.
६, ७. (क) इस्राएली लोकांना कोणता निर्णय घ्यायचा होता? (ख) असा निर्णय घेणं त्यांच्यासाठी अवघड का होतं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
६ इस्राएली लोक जेव्हा वचन दिलेल्या देशात राहत होते, तेव्हा त्यांच्यासमोर एक निवड करण्याची वेळ आली. ती म्हणजे, यहोवाची उपासना करावी की अन्य दैवतांची. (यहोशवा २४:१५ वाचा.) वरवर पाहता याविषयीचा निर्णय घेणं सोपं होतं असं वाटतं. पण खरं पाहता त्यांच्या निर्णयाचे परिणाम म्हणजे जीवन किंवा मरण होतं. शास्त्यांच्या काळादरम्यान इस्राएली लोक चुकीची निवड करत राहिले. त्यांनी यहोवाची उपासना करण्याचं सोडून दिलं आणि ते खोट्या दैवतांची भक्ती करू लागले. (शास्ते २:३, ११-२३) नंतर, एलीया संदेष्ट्याच्या काळात इस्राएली लोकांना या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागला, की ते यहोवाची सेवा करतील की खोटा दैवत बआल याची. (१ राजे १८:२१) या दोघांमधून कोणाची सेवा करावी याची निवड करणं खरंतर सोपं आहे, असं कदाचित आपल्याला वाटेल. कारण, यहोवाची सेवा करणं हे नेहमीच योग्य आहे. एक सुज्ञ व्यक्ती कधीही अशा एखाद्या देवाची उपासना करणार नाही ज्याच्यामध्ये प्राणच नाही. पण इस्राएली लोकांना याविषयी निर्णय घेता आला नाही. बायबल म्हणतं इस्राएली लोक “दोहो मतांमध्ये” लटपटत होते. अशा वेळी एलीयाने सुज्ञपणा दाखवला आणि लोकांना खऱ्या देवाची, यहोवाची उपासना करण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केलं.
७ इस्राएली लोकांसाठी योग्य निवड करणं इतकं अवघड का होतं? याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे, त्यांचा यहोवा देवावर विश्वास नव्हता आणि त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. इस्राएली लोकांनी यहोवावर भरवसा ठेवला नाही. यहोवाविषयी आणि त्याने दिलेल्या सुज्ञ सल्ल्यांविषयी शिकण्यासाठी त्यांनी वेळ दिला नाही. जर त्यांनी या गोष्टी शिकण्यासाठी वेळ दिला असता, तर त्यांना सुज्ञ निर्णय घेण्यास मदत झाली असती. (स्तो. २५:१२) दुसरं कारण म्हणजे, इस्राएली लोकांवर इतर राष्ट्रांतील लोकांचा असलेला प्रभाव. या परराष्ट्रीय लोकांनी इस्राएली लोकांच्या विचारसरणीवर मोठा प्रभाव पाडला. इतकंच नाही तर त्यांनी इस्राएली लोकांसाठी निर्णयदेखील घेतले. याचा परिणाम म्हणजे इस्राएली लोकांनी या परराष्ट्रीय लोकांचं अनुकरण करण्यास सुरवात केली आणि त्यांच्या खोट्या दैवतांची ते उपासना करू लागले. यहोवा देवाने या गोष्टीविषयी इस्राएली लोकांना बऱ्याच वर्षांपूर्वी सावध केलं होतं.—निर्ग. २३:२.
इतरांनी तुमच्यासाठी निर्णय घ्यावेत का?
८. इस्राएली लोकांकडून आपण कोणता धडा शिकतो?
८ इस्राएली लोकांच्या उदाहरणावरून आपल्याला एक धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, जर आपल्याला सुज्ञ निर्णय घ्यायचे असतील तर आपण देवाच्या वचनांवर अवलंबून राहिलं पाहिजे. गलतीकर ६:५ मध्ये म्हटलं आहे, आपल्यासाठी निर्णय घेण्याची जबाबदारी ही आपल्या स्वतःची आहे. यावरून हे स्पष्टच आहे, की आपल्यासाठी निर्णय घेण्याची जबाबदारी आपण इतरांवर टाकू नये. त्याऐवजी आपण प्रत्येकाने देवाच्या नजरेत काय योग्य आहे हे शिकून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे.
९. इतरांना आपल्यासाठी निर्णय घेऊ देणं धोकादायक का आहे?
९ चुकीची निवड करण्यासाठी इतरांच्या दबावाला जेव्हा आपण बळी पडतो, तेव्हा खरंतर आपण इतरांना आपल्यासाठी निर्णय घेऊ देत असतो. असं करणं धोकादायक आहे. (नीति. १:१०, १५) आपण आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा उपयोग केला पाहिजे; खरंतर ही आपली जबाबदारीच आहे. जर आपण इतरांना आपल्यासाठी निर्णय घेऊ देत असू, तर याचा अर्थ असा होईल की आपण “त्यांच्या मार्गाने” जात आहोत. अशी निवड आपल्याला खरोखर फार महागात पडू शकते.
१०. प्रेषित पौलाने गलतीकरांस कोणती ताकीद दिली?
१० प्रेषित पौलानेदेखील गलतीकरांस सल्ला दिला, की स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींबाबत त्यांनी इतरांना निर्णय घेऊ देऊ नये. (गलतीकर ४:१७ वाचा.) गलतीयामधील काही बांधव मंडळीतील इतर बांधवांसाठी निर्णय घेत होते. यामागे त्यांचा काय उद्देश होता? या स्वार्थी बांधवांची इच्छा होती की मंडळीतील बांधवांनी प्रेषितांऐवजी त्यांचं ऐकावं. या बांधवांमध्ये नम्रता नव्हती, आणि निर्णय घेण्याच्या इतरांच्या अधिकाराचाही ते आदर करायचे नाहीत.
११. इतरांना निर्णय घ्यायचे असतात तेव्हा आपण त्यांना कशी मदत करू शकतो?
११ प्रेषित पौलाच्या चांगल्या उदाहरणापासून आपण सर्व जण शिकू शकतो. आपल्या बांधवांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, याची पौलाला जाणीव होती. आणि त्यांच्या या अधिकाराप्रती त्याने आदरही दाखवला. (२ करिंथकर १:२४ वाचा.) आज वैयक्तिक निर्णय घेण्याच्या बाबतीत मंडळीतील वडील जेव्हा इतरांना काही सल्ला देतात, तेव्हा ते पौलाने मांडलेल्या या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. मंडळीतील वडील आनंदाने इतरांना देवाच्या वचनांवर आधारित माहिती देतात. पण जेव्हा ते असं करतात तेव्हा ते या गोष्टीची काळजी घेतात, की इतरांसाठी ते निर्णय घेणार नाहीत. कारण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांना, त्या बांधवाला किंवा बहिणीला स्वतः सामोरं जावं लागेल. याबाबतीत, आपल्या सर्वांसाठीच एक महत्त्वाचा धडा शिकण्यासाठी आहे: इतरांना निर्णय घेण्यास मदत व्हावी, यासाठी आपण त्यांना त्यांच्या परिस्थितीला लागू होतील असे बायबल आधारित सल्ले समजण्यास मदत करू शकतो. पण, काय निर्णय घ्यावा याचा अधिकार आणि त्याविषयी असलेली जबाबदारी ही त्या बांधवाची किंवा बहिणीची स्वतःची आहे. जेव्हा ते स्वतःसाठी सुज्ञ निर्णय घेतात, तेव्हा त्यांचाच फायदा होतो. स्पष्टच आहे, इतर बांधवांसाठी किंवा बहिणींसाठी निर्णय घेण्याचा आपल्याला अधिकार आहे, असा विचार आपण कोणीही करू नये.
निर्णय घेताना भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका
१२, १३. रागात असताना किंवा निराश झालेले असताना निर्णय घेणं योग्य का ठरणार नाही?
१२ आज अनेक लोक निर्णय घेताना त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते करतात. पण असं करणंही धोक्याचं आहे. बायबल आपल्याला ताकीद देतं की आपण आपले निर्णय भावनांच्या आधारावर किंवा आपल्या मनाला जे योग्य वाटेल त्याच्या आधारावर घेऊ नयेत. कारण, आपण अपरिपूर्ण आहोत. (नीति. २८:२६) आपण आपल्या मनावर किंवा हृदयावर भरवसा ठेवू शकत नाही, कारण “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्म. १७:९) बायबलमध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत जी दाखवून देतात, की अपरिपूर्ण हृदयावर भरवसा ठेवल्यामुळे किती वाईट परिणाम घडून आले आहेत. (१ राजे ११:९; यिर्म. ३:१७; १३:१०) निर्णय घेताना जर आपण आपल्या मनावर किंवा हृदयावर भरवसा ठेवला तर त्याचे काय परिणाम होतील?
१३ आपण आपल्या पूर्ण मनाने यहोवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती करावी, अशी आज्ञा यहोवा देवाने आपल्याला दिली आहे. (मत्त. २२:३७-३९) या आधीच्या परिच्छेदामध्ये दिलेल्या वचनांवरून हे स्पष्ट होतं की आपल्या भावनांना आपल्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण मिळवू देणं धोकादायक आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, रागात असलेल्या व्यक्तीला चांगले निर्णय घेणं अवघड असतं. (नीति. १४:१७; २९:२२) तसंच, जी व्यक्ती निराश झाली आहे तिलादेखील सुज्ञपणे निर्णय घेणं कठीण आहे. (गण. ३२:६-१२; नीति. २४:१०) आपण आपल्या विचारांना देवाच्या वचनांनी मार्गदर्शित केलं पाहिजे. (रोम. ७:२५) जेव्हा आपण काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतो, तेव्हा आपण आपल्या भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नये.
घेतलेले निर्णय कोणत्या परिस्थितीत बदलावेत?
१४. काही निर्णय बदलणं चुकीचं नाही हे आपण का म्हणू शकतो?
१४ जीवनात आपल्याला सुज्ञ निर्णय घ्यायला हवेत हे खरं आहे. पण असं असलं तरी, एका सुज्ञ व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असते, की तिने घेतलेल्या काही निर्णयांमध्ये तिला फेरबदल करावे लागतील. तसंच काही निर्णय कदाचित बदलावेही लागतील. याबाबतीत यहोवा देवाचं आपल्यासमोर सर्वोत्तम उदाहरण आहे. योनाच्या दिवसांमध्ये निनवेच्या लोकांविषयी त्याने काय केलं याकडे लक्ष द्या. बायबल म्हणतं: “देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणेल असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांजवर ते आणले नाही.” (योना ३:१०) जेव्हा यहोवा देवाने पाहिलं की निनवेचे लोक बदलले आहेत आणि त्यांनी वाईट गोष्टी करण्याचं सोडून दिलं आहे, तेव्हा त्याने स्वतःच्या निर्णयात फेरबदल केला. या उदाहरणावरून यहोवा देव हा समंजस, नम्र आणि प्रेमळ देव आहे हे दिसून येतं. मानवांप्रमाणे तो विचार न करता निर्णय घेत नाही; जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीचा राग येतो अगदी तेव्हाही.
१५. आपल्याला आपले निर्णय बदलण्याची गरज का पडू शकते?
१५ आपल्यासमोर कदाचित अशीही वेळ येऊ शकते, जेव्हा आपल्याला घेतलेल्या निर्णयांवर पुनर्विचार करण्याची गरज भासेल. उदाहरणार्थ, ज्या वेळी आपली १ राजे २१:२०, २१, २७-२९; २ राजे २०:१-५) तसंच जेव्हा आपल्याला काही नवीन माहिती मिळते, तेव्हाही आपल्या निर्णयांमध्ये कदाचित बदल करण्याची गरज पडू शकते. राजा दाविदाचं उदाहरण घ्या. शौलाचा नातू मफीबोशेथ याविषयी त्याने जो निर्णय घेतला होता तो त्याला मिळालेल्या चुकीच्या माहितीवर आधारित होता. पण नंतर जेव्हा दाविदाला खरी माहिती समजली तेव्हा त्याने आपला निर्णय बदलला. (२ शमु. १६:३, ४; १९:२४-२९) काही वेळा आपणही आपल्या निर्णयांमध्ये बदल करणं सुज्ञपणाचं ठरतं.
परिस्थिती बदलते त्या वेळी. यहोवा देवानेही काही वेळा घेतलेले निर्णय बदलले आहेत. (१६. (क) सुज्ञ निर्णय घेण्याच्या बाबतीत आणखी कोणते सल्ले उपयोगी ठरू शकतील? (ख) पूर्वी घेतलेल्या निर्णयांमध्ये बदल करण्याची गरज का पडू शकते, आणि आपण काय करण्यास संकोच करू नये?
१६ जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना आपण उतावळेपणा करू नये, असं बायबल आपल्याला सांगतं. (नीति. २१:५) आपण सर्व बाजूंचा आणि उपलब्ध असलेल्या माहितीचा चांगला विचार करावा. यामुळे आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यास मदत होईल. (१ थेस्सलनी. ५:२१) कोणताही निर्णय घेण्याआधी कुटुंबप्रमुखाने देवाच्या वचनांतून आणि आपल्या प्रकाशनांमधून संशोधन केलं पाहिजे. कुटुंबातील इतर सदस्यांचे विचार आणि दृष्टिकोन जाणून घेणंही योग्य ठरेल. एका प्रसंगी यहोवाने अब्राहामाला त्याच्या पत्नीचं ऐकण्यास सांगितलं याची आठवण ठेवा. (उत्प. २१:९-१२) मंडळीतील वडिलांनीही संशोधन करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. नवीन मिळालेल्या माहितीमुळे जेव्हा त्यांना जाणवतं की पूर्वी घेतलेल्या त्यांच्या निर्णयात त्यांना आता बदल करण्याची गरज आहे, तेव्हा ते आपल्या निर्णयांमध्ये बदल करण्यास संकोच करत नाहीत. आपण निर्णय बदलला तर इतर जण आपला आदर करणार नाहीत अशी भीती त्यांना वाटत नाही. एक समंजस आणि नम्र वडील आपल्या विचारांमध्ये आणि घेतलेल्या निर्णयांमध्ये गरजेप्रमाणे बदल करण्यास नेहमी तयार असतो. त्यांच्या या चांगल्या उदाहरणाचं आपण सर्वांनी अनुकरण करणं नक्कीच चांगलं ठरेल. यामुळे मंडळीत शांती आणि एकता टिकवून ठेवण्यासही मदत होईल.—प्रे. कृत्ये ६:१-४.
जो निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे कृती करा
१७. आपल्याला सुज्ञपणे निर्णय घेण्यास कोणती गोष्ट मदत करेल?
१७ जीवनात काही निर्णय हे जास्त महत्त्वपूर्ण असतात. उदाहरणार्थ, लग्न करावं की नाही किंवा कोणाशी लग्न करावं हे जीवनातील काही महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी आहेत. यासारखाच दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे पूर्णवेळेची सेवा कधी सुरू करावी हा आहे. यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याआधी आपण परिस्थितीचा चांगला विचार केला पाहिजे आणि यहोवाकडे प्रार्थनेत मदत मागितली पाहिजे. असे निर्णय घेताना वेळ लागू शकतो. पण जर आपल्याला सुज्ञपणे निर्णय घ्यायचा असेल, तर आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. त्याने दिलेल्या मार्गदर्शनाचं आणि सूचनांचं आपण पालन केलं पाहिजे. (नीति. १:५) यहोवाने आपल्याला त्याच्या वचनांमध्ये उत्तम सल्ले दिले आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास करणं आणि यहोवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करणं फार महत्त्वाचं आहे. असं केल्यास यहोवा त्याच्या इच्छेनुसार योग्य निर्णय घेण्यासाठी लागणाऱ्या क्षमता आपल्याला देईल. महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी आपण नेहमी स्वतःला विचारलं पाहिजे: ‘माझ्या या निर्णयामुळे, मी यहोवावर प्रेम करतो हे दिसून येईल का? माझ्या कुटुंबामध्ये आनंद आणि शांती राहील का? आणि या निर्णयामुळे माझ्यातील सहनशीलता आणि प्रेमळपणा दिसेल का?’
१८. आपण स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा का करतो?
१८ आपण यहोवावर प्रेम करावं आणि त्याची सेवा करावी यासाठी तो आपल्याला जबरदस्ती करत नाही. त्याऐवजी त्याने आपल्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. आपण त्याची सेवा करावी की नाही हे ठरवण्याच्या आपल्या अधिकाराचा आणि जबाबदारीचा तो आदर करतो. (यहो. २४:१५; उप. ५:४) पण यासोबतच त्याच्या वचनांच्या आधारावर आपण जे निर्णय घेतले आहेत, त्यांनुसार आपण कृती करावी अशीही तो आपल्याकडून अपेक्षा करतो. जेव्हा आपण यहोवाकडून मिळालेल्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या वचनांमधील तत्त्वं जीवनात लागू करतो, तेव्हा आपण सुज्ञ निर्णय घेऊ शकतो. असं केल्याने आपण दाखवून देऊ की आपण आपल्या सर्व मार्गांमध्ये स्थिर आहोत.—याको. १:५-८; ४:८.