व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

Oleh_Slobodeniuk/E+ via Getty Images

आपली पृथ्वी टिकून राहील असं देवाने वचन दिलंय

आपली पृथ्वी टिकून राहील असं देवाने वचन दिलंय

“पृथ्वीमध्ये स्वतःची झीज भरून काढण्याची क्षमता, आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा जबरदस्त आहे.”

असं संशोधकांच्या एका टीमने हवामान बदलाबद्दल बोलताना म्हटलं. मानवांवर प्रेम करणाऱ्‍या निर्माणकर्त्यावर तुमचा विश्‍वास आहे का? जर असेल, तर या संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे त्याने ही पृथ्वी किती अद्‌भुत रितीने बनवली आहे हे तुम्हाला जाणवेल. आणि पृथ्वीचं कितीही नुकसान झालं तरी तिच्यामध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे, हेही तुम्हाला समजेल.

तरी, मानवांनी पृथ्वीचं इतकं नुकसान केलंय, की ती स्वतःहून नुकसान भरून काढू शकत नाही. आता देवच हे नुकसान भरून काढू शकतो. पण तो नक्की असं करेल याची आपण खात्री का ठेवू शकतो?

पुढे दिलेल्या चौकटीत काही वचनं दिली आहेत, त्यावरून आपल्याला खात्री मिळते की पृथ्वी फक्‍त टिकूनच राहणार नाही तर ती बहरेलसुद्धा.

  • देवाने पृथ्वीला निर्माण केलंय. “सुरुवातीला देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.”​—उत्पत्ती १:१

  • देव या पृथ्वीचा मालक आहे. “पृथ्वी आणि तिच्यावर असलेलं सर्वकाही यहोवाचं a आहे.”​—स्तोत्र २४:१

  • पृथ्वी टिकून राहील अशा पद्धतीने देवाने ती बनवली आहे. “त्याने पृथ्वीला तिच्या पायांवर स्थिर केलंय; आपल्या ठिकाणावरून ती कधीच हलवली जाणार नाही.”​—स्तोत्र १०४:५

  • देवाने वचन दिलंय की या पृथ्वीवर जीवन कायम राहील. ‘ज्या खऱ्‍या देवाने पृथ्वी घडवली त्याने ती विनाकारण बनवली नाही, तर तिच्यावर लोकांनी राहावं म्हणून तिला घडवलं.’​—यशया ४५:१८

  • देवाने वचन दिलंय की माणसं या पृथ्वीवर कायम राहतील. “नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.”​—स्तोत्र ३७:२९

देवाने पृथ्वीला आशा प्रकारे बनवलंय, की मानवांमुळे तिचं थोडंफार नुकसान झालं तरी ती ते भरून काढू शकते. यहोवा देवाने बायबलमध्ये आधीच असं वचन दिलंय की तो त्याच्या वेळेत, मानवांनी स्वार्थी कारणांमुळे पृथ्वीचं जे नुकसान केलंय ते थांबवेल.​—प्रकटीकरण ११:१८

बायबलमध्ये देवाने असं वचन दिलंय, की तो लवकरच या पृथ्वीला सुंदर बागेसारखी करेल. आणि “आपली मूठ उघडून, प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण” करेल.​—स्तोत्र १४५:१६

a बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं दिलंय.​—स्तोत्र ८३:१८.