मुख्य विषय | आपल्या सवयींवर ताबा कसा मिळवाल?
३ प्रयत्न करत राहा, हार मानू नका!
एका जाणकाराच्या मते, एखादी नवीन सवय अंगवळणी पडायला २१ दिवस लागतात. पण संशोधनावरून असं दिसून आलं की स्वतःत मोठे बदल करायला काही लोकांना त्याहून कमी वेळ लागू शकतो, तर काही लोकांना त्यापेक्षा जास्त. पण जर तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर धीर सोडू नका.
कल्पना करा: तुम्ही आठवड्यातून तीन दिवस व्यायाम करण्याचं ध्येय ठेवलं आहे.
-
पहिल्या आठवड्यात अगदी ठरवल्याप्रमाणे तुम्ही तुमचं ध्येय गाठलं.
-
दुसऱ्या आठवड्यात तुम्ही फक्त दोन दिवस व्यायाम केलात.
-
तिसऱ्या आठवड्यात तुम्ही ठरवलेले सर्व दिवस व्यायाम केला.
-
चौथा आठवडा अगदी वाईट गेला तुम्ही जेमतेम एक दिवस व्यायाम केलात.
-
पाचव्या आठवड्यात पुन्हा तुम्ही ठरवल्याप्रमाणे तीन दिवस व्यायाम केलात आणि त्यानंतर नेहमी आपलं ध्येय गाठलं.
तुम्हाला एक नवीन सवय अंगवळणी पडायला पाच आठवडे लागले. पाच आठवडे कदाचित जरा जास्त वाटतील. पण एकदा का तुम्ही आपलं ध्येय गाठलं, तर या गोष्टीचं समाधान असेल की तुम्ही स्वतःला एक चांगली सवय लावून घेतली आहे.
बायबल तत्त्व: “धार्मिक सात वेळा पडला तरी पुनः उठतो.”—नीतिसूत्रे २४:१६.
बायबलमधून आपल्याला हार न मानण्याचा सल्ला मिळतो. आपण किती वेळा पडलो हे महत्त्वाचं नाही तर आपण किती वेळा पुन्हा उठलो याला जास्त महत्त्व आहे.
आपण किती वेळा पडलो हे महत्त्वाचं नाही, तर आपण किती वेळा पुन्हा उठलो याला जास्त महत्त्व आहे
तुम्ही हे कसं करू शकता
-
तुम्ही एखादी नवीन गोष्ट करायला सुरू केली, पण मध्येच त्यात खंड पडला तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही ते ध्येय कधीच गाठू शकणार नाही. ध्येय गाठताना वाटेत अडथळे येतील हे धरून चाला.
-
तुम्हाला ध्येय गाठण्यात किती वेळा यश मिळालं त्यावर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मुलांसोबत नीट बोलण्याचं ध्येय ठेवलं आहे. स्वतःला विचारा: मागच्या वेळी तुम्हाला तुमच्या मुलांवर कधी ओरडावंसं वाटलं होतं? पण ओरडण्याऐवजी तुम्ही काय केलं होतं? तुम्ही ते पुन्हा कसं करू शकता? स्वतःला असे प्रश्न विचारल्यामुळे तुम्ही किती वेळा अपयशी ठरलात यापेक्षा, किती वेळा यशस्वी झालात यावर लक्ष केंद्रित करायला तुम्हाला मदत मिळेल.
तुमच्या जीवनातील इतर प्रश्न जसं की, मी चिंतांचा सामना कसा करू शकतो? सुखी कुटुंब कसं घडवू शकतो? आणि खरा आनंद कसा मिळवू शकतो? यांवर बायबल आधारित तत्त्वं तुमची मदत कशी करू शकतात हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? यासाठी तुम्ही एका यहोवाच्या साक्षीदारासोबत बोलू शकता किंवा jw.org/mr या आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. (g16-E No. 4)