व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संपूर्ण माहिती मिळवा

संपूर्ण माहिती मिळवा

समस्येचं मूळ कारण

भेदभाव हा सहसा चुकीच्या माहितीमुळे केला जातो. काही उदाहरणांचा विचार करा:

  • काहींचं असं चुकीचं मतं आहे, की स्त्रिया अशी कामं करू शकत नाहीत ज्यांमध्ये कौशल्याची, ताकदीची किंवा बुद्धीची गरज असते.

  • बरेच जण असा चुकीचा विचार करतात, की जर आपण खालच्या जातीत लग्न केलं, तर आपण अशुद्ध होऊ.

  • काही लोकांचा असा गैरसमज आहे, की ज्यांना एखादी शारीरिक दुर्बलता असते ते सहसा दुःखी किंवा निराश असतात.

अशा गोष्टींवर विश्‍वास ठेवणारे अनेक जण, आपलं मत पटवून देण्यासाठी बऱ्‍याच गोष्टी सांगतात. आणि ज्यांना त्यांचे विचार पटत नाहीत त्यांना काहीच कळत नाही, असं त्यांचं म्हणण असतं.

बायबल कशी मदत करतं?

“मनुष्य ज्ञानाविना असणेही बरे नाही.”—नीतिसूत्रे १९:२, पं.र.भा.

या शास्त्रवचनातून आपण काय शिकतो? हेच, की लोकांबद्दल आपल्याजवळ संपूर्ण माहिती नसेल किंवा ऐकलेल्या गोष्टींवर आपण विश्‍वास ठेवला, तर त्या लोकांबद्दल आपण चुकीची मतं बनवू शकतो.

संपूर्ण माहिती मिळवल्यामुळे कशी मदत होते?

आपण जर समाजातल्या विशिष्ट लोकांबद्दल संपूर्ण माहिती मिळवली, तर त्यांच्याबद्दल इतर जण सांगत असलेल्या खोट्या माहितीवर आपण विश्‍वास ठेवणार नाही. तसंच, समाजातल्या एखाद्या गटाबद्दल आपण स्वतःही काही चुकीची मतं बनवली असतील, तर खरं काय आहे हे जाणून घेतल्यानंतर आपण ती मतं बदलण्याचा प्रयत्न करू.

तुम्ही काय करू शकता?

  • समाजातल्या एखाद्या गटाबद्दल काही जण असं म्हणतील, की त्यातले लोक खूप वाईट आहेत. पण त्या गटातले सगळेच लोक वाईट असू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा.

  • त्या गटाबद्दल आपल्याकडे सगळीच माहिती नाही हे मान्य करा.

  • त्यांच्याबद्दल खरं काय ते जाणून घ्या.