सावध राहा! क्र. ३ २०२१ | निर्माणकर्त्याला मानायचं का?—तुम्ही स्वतः ठरवा
या विश्वाची आणि पृथ्वीवरच्या जीवनाची सुरुवात कशी झाली हा कायमच एक वादाचा विषय राहिला आहे. तुम्हाला काय वाटतं? हे विश्व कसं अस्तित्वात आलं? आपोआप, की कोणीतरी ते निर्माण केलं? या प्रश्नाचं उत्तर वाटतं त्यापेक्षा खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच सावध राहा! मासिकाच्या या अंकात याबद्दल काही जबरदस्त पुरावे दिले आहेत. त्यांचं परीक्षण करून तुम्ही स्वतःच योग्य निष्कर्षावर पोचू शकता.
तुम्ही हे कसं ठरवू शकता?
विश्वाची आणि जीवनाची सुरुवात कशी झाली हे अनेकांसाठी एक कोडच आहे.
विश्वाच्या अभ्यासातून काय समजतं
विश्वाच्या आणि पृथ्वीच्या रचनेकडे पाहिलं तर असं दिसतं, की जीवन टिकून राहण्यासाठी ती अगदी योग्य आहे. मग, त्यासाठीच त्यांची रचना करण्यात आली असेल का?
जीवसृष्टीच्या अभ्यासातून काय दिसून येतं
जीवसृष्टीमुळे पृथ्वी ग्रह इतका सुंदर आणि वेगळा आहे. मग जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली याबद्दल आपल्याला काय कळतं?
वैज्ञानिक काय सांगू शकत नाहीत
विश्वाची आणि जीवनाची सुरुवात कशी झाली याबद्दल विज्ञानाने काही पुरावे दिले आहेत का?
बायबल काय सांगतं
बायबलमध्ये सांगितलेला निर्मितीचा अहवाल वैज्ञानिक माहितीशी मेळ खातो का?
उत्तर का महत्त्वाचं आहे
सर्वशक्तिमान देव अस्तित्वात आहे याचे पुरावे तुम्हाला पटत असतील तर आता आणि भविष्यातही तुम्हाला त्याचा फायदा होईल.
पुरावे तपासून पाहा
निर्माणकर्ता आहे असं मानण्यासाठी काही आधार आहे का, ते स्वतः तपासून पाहा.