व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा

यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा

यहोवा एक उदार देव आहे. (याको. १:१७) विश्वाच्या अफाट पोकळीतील लक्षावधी ताऱ्यांपासून पृथ्वीवर पांघरलेल्या हिरव्यागार मखमलीपर्यंत, सर्व गोष्टी देवाच्या उदारतेची साक्ष देतात.—स्तो. ६५:१२, १३; १४७:७, ८; १४८:३, ४.

आपल्या निर्माणकर्त्याबद्दल स्तोत्रकर्त्याला खूप कदर होती. म्हणूनच, यहोवाच्या कृत्यांबद्दल एक गीत लिहिण्यास तो प्रवृत्त झाला. हे गीत आपल्याला स्तोत्र १०४ मध्ये वाचायला मिळतं. ते वाचल्यावर तुम्हालाही कदाचित स्तोत्रकर्त्यासारखंच वाटेल. त्यानं म्हटलं: “माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन; मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.” (स्तो. १०४:३३) तुम्हालाही असंच करावंसं वाटत नाही का?

उदारतेचं सर्वोत्तम उदाहरण

उदारतेबद्दल आपण यहोवाचं अनुकरण करावं असं त्याला वाटतं. आणि आपण असं का केलं पाहिजे याची सबळ कारणंही तो आपल्याला देतो. त्यानं प्रेषित पौलाला काय लिहिण्यासाठी प्रेरित केलं याकडे लक्ष द्या: “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी; चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.”—१ तीम. ६:१७-१९.

पौलानं करिंथ मंडळीला दुसरं पत्र लिहिलं, तेव्हा त्यानं दान देण्याविषयी योग्य दृष्टिकोन बाळगण्यावर जोर दिला. त्यानं म्हटलं: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथ. ९:७) हे सांगितल्यानंतर, त्यानं उदारतेनं दान दिल्यामुळे ज्यांना फायदा होतो त्यांचा उल्लेख केला. तो म्हणाला, की ज्यांना दान मिळतं त्यांच्या गरजा भागवल्या जातात. शिवाय, जे दान देतात त्यांना अनेक आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात.—२ करिंथ. ९:११-१४.

पौलानं आपल्या पत्राच्या शेवटी देवाच्या उदारतेच्या सर्वात मोठ्या पुराव्याबद्दल सांगितलं. त्यानं म्हटलं: “देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो.” (२ करिंथ. ९:१५) यहोवा देत असलेल्या अवर्णनीय दानामध्ये, तो येशू ख्रिस्ताद्वारे संपूर्ण मानवजातीला जो काही चांगुलपणा दाखवत आहे त्याचा समावेश होतो. या चांगुलपणाचं मोल शब्दांत व्यक्त करणं शक्य नाही.

यहोवा आणि त्याच्या पुत्रानं आपल्यासाठी जे केलं आणि भविष्यात जे करणार आहे, त्यासाठी आपण कदर कशी दाखवू शकतो? एक मार्ग म्हणजे, यहोवाच्या शुद्ध उपासनेला वाढवण्यासाठी आपल्या वेळेचा, शक्तीचा आणि साधनसंपत्तीचा उदारतेनं उपयोग करणं. मग, ते अगदी कमी प्रमाणात असो किंवा मोठ्या प्रमाणात.—१ इति. २२:१४; २९:३-५; लूक २१:१-४.

^ परि. 11 भारतात हे “जेहोवाज विट्नेसेस ऑफ इंडिया”ला देय असावे.

^ परि. 13 भारतीय पासपोर्ट धारक www.jwindiagift.org या वेबसाईटचा उपयोग करू शकतात.

^ परि. 18 अंतिम निर्णय घेण्याआधी स्थानिक शाखा कार्यालयाशी याबद्दल खात्री करून घ्या.

^ परि. 26 भारतात, “तुमच्या मौल्यवान वसतूंनी यहोवाचा सन्मान करा” नावाची पत्रिका इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम व हिंदी या भाषांत उपलब्ध आहे.