व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मानवजातीच्या भवितव्याविषयी

मानवजातीच्या भवितव्याविषयी

येशू काय शिकवतो

मानवजातीच्या भवितव्याविषयी

येशूने स्वर्गीय जीवनाचे वचन दिले आहे का?

होय, येशूने स्वर्गीय जीवनाचे वचन दिले आहे. स्वतः येशूलाही मृत्यूतून जिवंत करण्यात आले होते व तो पुन्हा आपल्या पित्याकडे स्वर्गात गेला. पण त्याचा मृत्यू आणि देवाने त्याला पुन्हा जिवंत करण्याआधी त्याने आपल्या ११ विश्‍वासू शिष्यांना असे सांगितले: “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; . . . मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो.” (योहान १४:२) पण स्वर्गात जाणाऱ्‍यांची संख्या कमी असणार होती. आपल्या शिष्यांना त्याने जे म्हटले त्यावरून हे स्पष्टपणे कळते. तो त्यांना म्हणाला: “हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.”—लूक १२:३२.

हा ‘लहान कळप’ स्वर्गात जाऊन काय करेल?

या लहान गटाने येशूसोबत स्वर्गात एका सरकारचे भाग बनावे, अशी पित्याची इच्छा आहे. कशावरून आपण हे सांगू शकतो? येशूला मृत्यूतून पुन्हा जिवंत केल्यानंतर त्याने प्रेषित योहानाला असे सांगितले, की काही विश्‍वासू जण “पृथ्वीवर राज्य करितील.” (प्रकटीकरण १:१; ५:९, १०) ही आनंदाची गोष्ट आहे. मानवजातीला अनेक गोष्टींची गरज आहे. एका चांगल्या सरकारची तर त्यांना अत्यंत गरज आहे. येशू जे सरकार चालवणार आहे ते कोणकोणत्या गोष्टी साध्य करेल? येशू याविषयी असे म्हणतो: “पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीहि बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल.” (मत्तय १९:२८) येशूच्या आणि त्याच्या अनुयायांच्या सरकारात, सद्य परिस्थितीची ‘पुनरुत्पत्ती,’ किंवा तिचे नविनीकरण होईल. अर्थात, पहिले मानवी जोडपे पाप करण्याआधी ज्या परिपूर्ण परिस्थितीत होते तशीच परिस्थिती पुन्हा येईल.

पण मग बाकीच्या मानवजातीला येशूने कोणती आशा दिली?

मानवजातीला खरे तर पृथ्वीवर राहण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. आणि येशूला स्वर्गात राहण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. (स्तोत्र ११५:१६) म्हणूनच येशूने म्हटले: “तुम्ही खालचे आहा, मी वरचा आहे.” (योहान ८:२३) पृथ्वीवर मानवजातीसाठी असलेल्या एका अद्‌भुत भवितव्याविषयी येशूने सांगितले. एकदा तो म्हणाला: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्तय ५:५) तो खरे तर अप्रत्यक्षपणे एका स्तोत्राविषयी बोलत होता ज्यात असे म्हटले आहे: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:११, २९.

त्यामुळे स्वर्गात जाणाऱ्‍या केवळ ‘लहान कळपालाच’ सार्वकालिक जीवनाचे वरदान मिळत नाही तर कोट्यवधी इतर लोकांनाही मिळेल, असे येशूने म्हटले. याविषयी तो असे म्हणाला: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.

देव मानवजातीवरील दुःख कसे काढून टाकणार आहे?

मानवजातीवर ज्या दोन कारणांमुळे जुलूम होत आहे त्यांच्यापासून त्यांची सुटका केली जाईल. याविषयी येशूने असे म्हटले: “आता ह्‍या जगाचा न्याय होतो, आता ह्‍या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल.” (योहान १२:३१) पहिल्यांदा, ज्या वाईट लोकांमुळे दुःख आहे त्यांचा न्याय करून मग नाश केला जाईल. आणि मग सैतानाला बाहेर टाकले जाईल. यानंतर तो मानवजातीला बहकवू शकणार नाही.

पण ज्या लोकांचा, देव आणि ख्रिस्त यांच्याबद्दलचे ज्ञान घेऊन त्यांच्यावर विश्‍वास ठेवायची संधी मिळायच्या आधीच मृत्यू झाला अशा लोकांबद्दल काय? येशूने त्याच्या शेजारच्या खांबावर मरणाऱ्‍या अपराध्याला असे सांगितले: “तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील.” (लूक २३:४३, NW) या मनुष्याला आणि इतर असंख्य लोकांना जेव्हा पृथ्वीवरील नंदनवनात मृत्यूतून पुन्हा जिवंत केले जाईल तेव्हा त्यांच्यासोबत त्याला देवाविषयी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर मग, पृथ्वीवरील नम्र व धार्मिक लोकांना मिळणारे सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा सुहक्कही त्याला मिळेल.—प्रेषितांची कृत्ये २४:१५. (w०९ ०८/०१)

अधिक माहितीकरता, बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकाचे अध्याय ३ पाहा. *

[तळटीप]

^ परि. 13 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले.

[२९ पानांवरील चित्र]

“नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:२९