व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांसाठी

आमच्या वाचकांसाठी

तुम्ही आता जे नियतकालिक वाचत आहात त्याच्या प्रकाशनाची सुरुवात जुलै १८७९ या सालापासून झाली. पण काळ बदलत गेला तसे या नियतकालिकेतसुद्धा बदल होत गेले. (वरील चित्रे पाहा.) या अंकापासून टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या स्वरूपात आणखी काही बदल करण्यात आल्याचे तुमच्या लक्षात येईल. काय बदल असेल?

बऱ्‍याच देशांमध्ये अधिकाधिक लोक ऑनलाईन माहिती मिळवतात आणि ही पद्धत त्यांना अधिक सोयीस्कर वाटते. केवळ माऊसच्या एका क्लिकवर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचे भांडार त्यांच्यापुढे खुले होते. अनेक मासिके, पुस्तके व वृत्तपत्रे ऑनलाईन वाचली जाऊ शकतात.

लोकांचा हा कल विचारात घेता, अलीकडेच आम्ही आमच्या www.mt1130.com वेबसाईटची पुनर्रचना केली आहे. त्यामुळे ही वेबसाईट अधिक रोचक आणि वापरण्यास सोपी जाईल. या वेबसाईटमुळे लोक ४३० हून अधिक भाषांत निरनिराळी प्रकाशने वाचू शकतात. पण, या महिन्याच्या सुरुवातीपासून लोकांना या वेबसाईटवर काही निवडक लेखही वाचता येतील. हे लेख आतापर्यंत आमच्या प्रकाशनांत छापण्यात आले होते. पण आता तेच लेख फक्‍त सदर वेबसाईटवरच वाचायला मिळतील. *

बरेच लेख आता फक्‍त ऑनलाईन प्रकाशित केले जातील. त्यामुळे टेहळणी बुरूज नियतकालिकाची सार्वजनिक आवृत्ती आता या अंकापासून ३२ पानांची नसून १६ पानांची असेल. तसेही हे नियतकालिक २०४ भाषांमध्ये प्रकाशित केले जात होते. पण नियतकालिकाच्या या संक्षिप्त स्वरूपामुळे आता ते आणखी जास्त भाषांमध्ये भाषांतरित केले जाण्याची शक्यता आहे.

आमची आशा आहे की नियतकालिकातील या बदलांमुळे बायबलचा जीवनदायी संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे आम्हाला शक्य होईल. बायबलचा आदर करणाऱ्‍या व ते काय शिकवते हे जाणून घेण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या आमच्या वाचकांच्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात बोधपर व रोचक माहिती छापील स्वरूपात व ऑनलाईन पुरवत राहण्याचा आम्ही दृढनिश्‍चय केला आहे. (w१३-E ०१/०१)

प्रकाशक

^ कोणते लेख फक्‍त ऑनलाईन वाचायला मिळतील त्यांपैकी काही पुढे सांगितले आहेत. “For Young People,” या सदरात तरुणांकरता बायबल अभ्यास उपक्रम आहेत, आणि “My Bible Lessons,” ही लेखमाला पालक आपल्या तीन किंवा त्याहूनही कमी वय असलेल्या मुलांबरोबर वाचू शकतात.