बायबल प्रश्नांची उत्तरे
सैतान मुळात आला कोठून?
सैतानाला देवाने बनवले नाही. देवाने तर एका चांगल्या देवदूताला बनवले होते, पण पुढे तो देवदूत स्वतःच सैतान बनला. त्या दुष्ट दूताला बायबलमध्ये दियाबल असेही म्हटले आहे. येशूने असेही सूचित केले की, एके काळी सैतान सात्विक व सरळ होता. यावरून स्पष्ट होते, की सुरुवातीला सैतान एक नीतिमान देवदूत होता.—योहान ८:४४ वाचा.
एक चांगला देवदूत सैतान कसा बनू शकतो?
एकेकाळी नीतिमान असलेला हा देवदूत देवाच्या विरोधात उभा राहिला आणि त्याने पहिल्या मानवी जोडप्यालाही देवाविरुद्ध भडकवले. अशा प्रकारे तो स्वतः सैतान अर्थात “विरोधक” बनला.—उत्पत्ति ३:१-५; प्रकटीकरण १२:९ वाचा.
स्वतःहून सैतान बनलेल्या या दूताला देवाच्या इतर बुद्धिमान प्राण्यांप्रमाणेच बऱ्यावाइटातील निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. पण, सगळ्यांनी आपली भक्ती करावी अशी चुकीची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. गौरव मिळण्याची त्याची ही इच्छा देवाला संतुष्ट करण्याच्या इच्छेपेक्षा प्रबळ होती.—मत्तय ४:८, ९; याकोब १:१३, १४ वाचा.
सैतान आजसुद्धा लोकांना कसा फसवतो? आपल्याला त्याची भीती वाटावी का? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये सापडतील. (w१३-E ०२/०१)