व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही देवावर विश्‍वास ठेवणार का?

तुम्ही देवावर विश्‍वास ठेवणार का?

अशी कल्पना करा की तुमचा एक सर्वात प्रिय मित्र आहे ज्याच्याविषयी तुम्हाला खूप कौतुक वाटते. पण त्याने एखादी गोष्ट का केली याचे कारण तुम्हाला कळत नाही. त्याने जे काही केले त्यासाठी इतर लोक त्याची टीका करतात व त्याच्या हेतूंवर प्रश्‍न करतात. ते तुम्हाला म्हणतात की तुमचा मित्र निर्दयी आहे. तुम्ही लगेच त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवणार का, की तुमच्या मित्राची बाजू ऐकून घेण्यास थांबणार? तुमचा मित्र जर त्याच्या कृत्याचे कारण सांगण्यास तिथे उपस्थित नसला तर लगेच त्याचा न्याय करण्याऐवजी तुम्ही धीर धराल का?

या प्रश्‍नाचे उत्तर देण्याआधी तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायची इच्छा असेल. तुम्ही कदाचित असा विचार कराल: ‘माझ्या या मित्राला मी किती चांगल्या प्रकारे ओळखतो, आणि मला त्याच्याबद्दल इतकं कौतुक का वाटतं?’ असा विचार करणे योग्य आहे. तर मग देव निर्दयी आहे यावर विश्‍वास ठेवण्याआधी आपण वरील प्रश्‍न स्वतःला का विचारू नये?

देव एखादी गोष्ट का करतो हे कदाचित आपल्याला समजण्यास कठीण जाऊ शकते किंवा काही घटना तो का घडू देतो याविषयी आपण कदाचित गोंधळात पडू. पुष्कळ लोक तुम्हाला सांगतील की देव निर्दयी आहे व त्यांच्याप्रमाणेच ते तुम्हाला देवाच्या हेतूंवर प्रश्‍न करण्यास आग्रह करतील. देवाविषयी आणखी जास्त माहिती मिळेपर्यंत तुम्ही त्याच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगणार का? तुम्ही देवाला किती चांगल्या प्रकारे ओळखता यावर तुमचे उत्तर अवलंबून आहे. तर मग स्वतःला विचारा, ‘देवाने एक मित्र म्हणून माझ्यासाठी आजपर्यंत कायकाय केले आहे?’

तुम्ही तुमच्या जीवनात बऱ्‍याच समस्यांचा सामना केला असेल तर तुम्ही म्हणाल की देव माझा मित्र कधीच नव्हता. पण यावर थोडा विचार करा. तुम्ही देवाला तुमच्या जीवनातील समस्यांसाठी जबाबदार ठरवणार की आशीर्वादांसाठी? आपण आधी पाहिल्याप्रमाणे सैतान “या जगाचा अधिकारी” आहे, यहोवा नव्हे. (योहान १२:३१) तर मग, जगातील सर्व दुःखांसाठी व अन्यायासाठी सैतान जबाबदार आहे. शिवाय आपल्या अपरिपूर्णतेमुळे आणि होणाऱ्‍या घटनांवर आपले नियंत्रण नसल्यामुळे आपल्याला दुःख सहन करावे लागते याच्याशी तुम्ही सहमत व्हाल.

तुम्ही देवाला तुमच्या जीवनातील समस्यांसाठी जबाबदार ठरवणार की आशीर्वादांसाठी?

दुसरीकडे पाहता देवाने कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत? बायबल काय म्हणते ते पाहा. ते म्हणते, की यहोवा “आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता” आहे, आपल्या शरीराची रचना त्याने “अद्‌भुत रीतीने” केली आहे आणि त्याच्या हाती आपला “प्राण आहे.” (स्तोत्र १२४:८; १३९:१४; दानीएल ५:२३) या सर्व गोष्टींचा काय अर्थ होतो?

याचा अर्थ आपले जीवन आपल्या निर्माणकर्त्यामुळेच शक्य झाले आहे. (प्रेषितांची कृत्ये १७:२८) आपले जीवन, जगातल्या सुंदर गोष्टी, प्रेमात व मैत्रीत मिळणारा आनंद, स्वाद घेण्याचा आनंद, स्पर्श करणे, ऐकणे व सुवास घेणे या सर्व क्षमता देवाने आपल्याला भेट म्हणून दिल्या आहेत. (याकोब १:१७) तर मग हे सर्व आशीर्वाद त्याला एक मित्र बनवत नाहीत का ज्याचा आपण आदर करू शकतो, ज्याच्यावर आपण विश्‍वास ठेवू शकतो?

मान्य आहे की देवावर विश्‍वास ठेवणे कदाचित तुम्हाला कठीण जाईल. त्याच्यावर विश्‍वास ठेवण्याइतके तुम्ही त्याला ओळखत नाही असे तुम्हाला वाटत असेल. आणि ही गोष्ट समजण्याजोगी आहे. काही लोक देवाला निर्दयी का म्हणतात याबद्दलची सगळीच कारणे या लेखांमध्ये चर्चा करणे शक्य नाही. पण, देवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणार नाही का? * देवाला ओळखण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न कराल त्यांमुळे देवाबद्दलचे सत्य तुम्हाला कळेल हे आम्ही खातरीने सांगू शकतो. तो निर्दयी आहे का? नाही, याच्या अगदी उलट तो “प्रीती आहे.”—१ योहान ४:८. ▪ (w१३-E ०५/०१)

^ उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात देवाने दुष्टाईचा अंत अजून का केला नाही याबद्दल सांगितले आहे.