प्रश्न ५
बायबलवर विश्वास ठेवणं तर्कसंगत आहे का?
तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? एखाद्या व्यक्तीबद्दल इतरांचं मत ऐकल्यावर किंवा एखाद्या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे, हे त्यांच्याकडून ऐकल्यावर तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल काहीसं नकारात्मक चित्र निर्माण होतं. ही व्यक्ती आपल्याला आवडणार नाही असं तुमचं मत बनतं. पण, त्या व्यक्तीला तुम्ही प्रत्यक्ष भेटता, तेव्हा मात्र तुम्हाला जाणीव होते, की तुम्हाला तिच्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आली होती. बायबलच्या बाबतीतही बऱ्याच जणांना काहीसा असाच अनुभव आला आहे.
बऱ्याच सुशिक्षित लोकांचं बायबलविषयी चांगलं मत नाही. याचं कारण तुम्ही समजू शकता का? बऱ्याचदा या पुस्तकाबद्दलची माहिती किंवा त्यातले उतारे अशा प्रकारे सादर केले जातात, की ज्यामुळे ते तर्कशून्य, विज्ञानाशी ताळमेळ नसलेले किंवा चुकीचे आहेत असं वाटतं. पण, बायबलबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे, असं तर नाही ना?
हे माहितीपत्रक वाचताना, बायबल जे सांगतं ते वैज्ञानिक दृष्टीने अचूक आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटलं का? बऱ्याच लोकांना हे जाणून आश्चर्य वाटतं. आणि त्याच प्रकारे बऱ्याच लोकांना हेही जाणून फार आश्चर्य वाटतं, की बायबलमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत असं बरेच धर्म म्हणतात, त्यांपैकी काही गोष्टी खरंतर बायबलमध्ये सांगितलेल्याच नाहीत. उदाहरणार्थ, काही जण असं सांगतात की देवाने सबंध विश्व आणि त्यातले सर्व जीव २४ तासांच्या सहा दिवसांत निर्माण केले असं बायबल शिकवतं. पण, खरं पाहिलं तर विश्वाच्या किंवा पृथ्वीच्या वयाबद्दल शास्त्रज्ञांच्या निरनिराळ्या अंदाजांशी मेळ बसत नाही असं काहीही बायबलमध्ये सांगितलेलं नाही. a
शिवाय, देवाने या ग्रहावर जीवसृष्टी कशी निर्माण केली याविषयी बायबलमध्ये थोडक्यात दिलेल्या माहितीवर, बरंच वैज्ञानिक संशोधन आणि तर्क केला जाऊ शकतो. देवाने सर्व जीवसृष्टी अस्तित्वात आणली आणि “प्रत्येक जातीचे” जीव निर्माण केले असं बायबलमध्ये सांगितलं आहे हे खरं आहे. (उत्पत्ति १:११, २१, २४) ही विधाने काही वैज्ञानिक सिद्धान्तांशी कदाचित सुसंगत नसतील, पण सिद्ध झालेल्या वैज्ञानिक वस्तुस्थितीशी त्यांचा नक्कीच मेळ बसतो. विज्ञानाचा इतिहास पाहिला, तर सिद्धान्त हे येतात आणि जातात; पण वस्तुस्थिती कधीच बदलत नाही.
पण असे बरेच लोक आहेत जे बायबलविषयी जास्त माहिती घ्यायचं टाळतात. कारण, धर्मावरूनच त्यांचा विश्वास उडाला आहे. बायबलचं पालन करण्याचा दावा करणाऱ्या धर्मांकडे ते पाहतात तेव्हा त्यांचा ढोंगीपणा, भ्रष्टाचार आणि त्यांचा युद्ध व रक्तपाताचा इतिहास त्यांना दिसतो. पण, बायबलचं पालन करण्याचा दावा करणाऱ्या काही लोकांच्या वर्तनामुळे बायबलविषयीच चुकीचं मत करून घेणं योग्य ठरेल का? माणुसकीची जाण असलेल्या प्रामाणिक मनाच्या बऱ्याच शास्त्रज्ञांना हे पाहून मनापासून दुःख होतं, की उत्क्रांतीच्या सिद्धान्ताचा आधार घेऊन अनेक हिंसक आणि संकुचित मनाच्या लोकांनी स्वतःच्या जातीच्या श्रेष्ठतेचं समर्थन करण्याचा आणि आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण, अशा लोकांच्या कृत्यांच्या आधारावर उत्क्रांतीच्या सिद्धान्ताविषयी मत बनवणं योग्य ठरेल का? त्यापेक्षा, या सिद्धान्तात कोणते विचार मांडले आहेत हे पडताळून पाहणं आणि उपलब्ध पुराव्यांशी त्यांची तुलना करणं नक्कीच जास्त फायद्याचं ठरेल.
बायबलच्या बाबतीतही आम्ही तुम्हाला हेच करण्याचं प्रोत्साहन देतो. यातल्या शिकवणी इतर धार्मिक विश्वासांपेक्षा किती वेगळ्या आहेत हे पाहून तुम्हाला नवल वाटेल. युद्धं आणि जातीय हिंसाचार यशया २:२-४; मत्तय ५:४३, ४४; २६:५२) धर्मांधता किंवा अंधविश्वास यांचं समर्थन करण्याऐवजी बायबल असं शिकवतं, की खरा विश्वास उत्पन्न होण्यासाठी पुराव्याची गरज आहे आणि आपल्या समजशक्तीचा उपयोग केल्यामुळेच आपल्याला देवाची सेवा करणं शक्य होतं. (रोमकर १२:१; इब्री लोकांना ११:१) बायबल जिज्ञासू वृत्तीचा गळा दाबत नाही, तर मानवांच्या मनात आलेल्या सर्वात रोचक आणि कठीण प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचं आपल्याला प्रोत्साहन देतं.
यांना बायबल मुळीच प्रोत्साहन देत नाही. उलट, देवाच्या सेवकांनी युद्धांमध्ये भाग घेऊ नये, इतकंच काय तर हिंसाचाराला जन्म देणारा द्वेषही मनातून काढून टाकला पाहिजे असं बायबल शिकवतं. (उदाहरणार्थ, ‘जर देव अस्तित्वात आहे तर मग त्याने दुष्टता का राहू दिली आहे?’ या आणि अशा इतर अनेक प्रश्नांचं बायबल समाधानकारक उत्तर देतं. b सत्य जाणून घेण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करावा असं आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो. तुम्हाला या प्रश्नांची आनंददायक व पटण्यासारखी उत्तरं मिळतील आणि तीसुद्धा खात्रीलायक पुराव्यांसहित. अर्थात, ही उत्तरंसुद्धा काही आपोआप आलेली नाहीत.
a अधिक माहितीसाठी जीवसृष्टीची निर्मिती करण्यात आली का? (इंग्रजी) हे यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं माहितीपत्रक पाहा.
b यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातला ११ वा अध्याय पाहा.