व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलचा कालक्रम

बायबलचा कालक्रम
  1. “प्रारंभी . . .”

  2. इ.स.पू. ४०२६ (सुमारे ६,००० वर्षांपूर्वी) आदामाची निर्मिती

  3. इ.स.पू. ३०९६ (सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी) आदामाचा मृत्यू

  4. इ.स.पू.२३७० (सुमारे ४,३७० वर्षांपूर्वी) जलप्रलय

  5. इ.स.पू. २०१८ अब्राहामाचा जन्म

  6. इ.स.पू. १९४३ (सुमारे ३,९५० वर्षांपूर्वी) अब्राहामाशी करार

  7. इ.स.पू. १७५० (सुमारे ३,७५० वर्षांपूर्वी) योसेफाला गुलाम म्हणून विकले जाते

  8. इ.स.पू. १६१३ च्या आधी (सुमारे ३,६२० वर्षांपूर्वी) ईयोबाची परीक्षा

  9. इ.स.पू. १५१३ (सुमारे ३,५२० वर्षांपूर्वी) इस्राएल लोक इजिप्तमधून बाहेर पडतात

  10. इ.स.पू. १४७३ यहोशवाच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक कनान देशात प्रवेश करतात

  11. इ.स.पू.१४६७ (सुमारे ३,४७० वर्षांपूर्वी) कनान देशाचा बहुतेक भाग हस्तगत केला जातो

  12. इ.स.पू. १११७ (सुमारे ३,१२० वर्षांपूर्वी) शौलाचा राज्याभिषेक

  13. इ.स.पू. १०७० देव दाविदाला अविनाशी राज्याचे वचन देतो

  14. इ.स.पू. १०३७ शलमोन राजा बनतो

  15. इ.स.पू. १०२७ (सुमारे ३,०३० वर्षांपूर्वी) जेरूसलेममधील मंदिराचे बांधकाम पूर्ण होते

  16. सुमारे इ.स.पू. १०२० गीतरत्न पुस्तकाचे लिखाण पूर्ण होते

  17. इ.स.पू. ९९७ (सुमारे ३,००० वर्षांपूर्वी) इस्राएलची दोन राज्ये बनतात

  18. सुमारे इ.स.पू. ७१७ (सुमारे २,७२० वर्षांपूर्वी) नीतिसूत्रांचे संकलन पूर्ण होते

  19. इ.स.पू. ६०७ (सुमारे २,६१० वर्षांपूर्वी) जेरूसलेमचा नाश; बॅबिलोनमधील बंदिवासाची सुरुवात

  20. इ.स.पू. ५३९ कोरेश बॅबिलोनचा पाडाव करतो

  21. इ.स.पू. ५३७ (सुमारे २,५४० वर्षांपूर्वी) यहुदी बंदिवान जेरूसलेमला परततात

  22. इ.स.पू. ४५५ जेरूसलेमच्या तटबंदीची पुनर्बांधणी; ६९ सप्तकांची वर्षे सुरू होतात

  23. इ.स.पू. ४४३ नंतर मलाखी संदेष्ट्याचे पुस्तक लिहून पूर्ण होते

  24. सुमारे इ.स.पू. २ येशूचा जन्म

  25. इ.स. २९ (सुमारे १,९८० वर्षांपूर्वी) येशूचा बाप्तिस्मा येशू देवाच्या राज्याचा प्रचार सुरू करतो

  26. इ.स. ३१ येशू १२ प्रेषितांची निवड करतो; डोंगरावरील प्रवचन देतो ३१

  27. इ.स. ३२ येशू लाजराचे पुनरुत्थान करतो

  28. निसान १४, इ.स. ३३ येशूला वधस्तंभावर खिळण्यात येते (निसान हा यहुदी महिना मार्च व एप्रिल महिन्यांत येतो)

  29. निसान १६, इ.स. ३३ येशूचे पुनरुत्थान

  30. सिवान ६, इ.स. ३३ पेन्टेकॉस्ट; पवित्र आत्मा ओतण्यात येतो (सिवान हा यहुदी महिना मे व जून महिन्यात येतो)

  31. इ.स. ३६ (सुमारे १,९७० वर्षांपूर्वी) कर्नेल्य ख्रिस्ती बनतो

  32. सुमारे इ.स. ४७-४८ पौलाचा पहिला प्रचार दौरा

  33. सुमारे इ.स. ४९-५२ पौलाचा दुसरा प्रचार दौरा

  34. सुमारे इ.स. ५२-५६ पौलाचा तिसरा प्रचार दौरा

  35. सुमारे इ.स. ६०-६१ रोम येथे कैदेत असताना पौल पत्रे लिहितो

  36. इ.स. ६२ च्या आधी येशूचा भाऊ याकोब पत्र लिहितो

  37. इ.स. ६६ यहुदी लोक रोमविरुद्ध विद्रोह करतात

  38. इ.स. ७० (सुमारे १,९३० वर्षांपूर्वी) रोमन लोक जेरूसलेमचा व तेथील मंदिराचा विनाश करतात

  39. सुमारे इ.स. ९६ योहान प्रकटीकरणाचे पुस्तक लिहितो

  40. सुमारे इ.स. १०० शेवटला प्रेषित योहान याचा मृत्यू