अध्याय पाच
खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट
-
खंडणी म्हणजे काय?
-
ती कशी देण्यात आली?
-
तिचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो?
-
तुम्हाला तिच्याबद्दल कदर आहे हे तुम्ही कसे दाखवू शकता?
१, २. (क) एखादी भेटवस्तू तुम्हाला मौल्यवान केव्हा वाटते? (ख) खंडणी ही तुम्हाला मिळालेली सर्वात मौल्यवान भेट आहे, असे तुम्ही का म्हणता?
तुम्हाला मिळालेल्या भेटवसतूंपैकी सर्वात मौल्यवान कोणती आहे? भेटवस्तू महागडीच असली पाहिजे असे नाही. कारण, एखाद्या भेटवस्तूचे मूल्य नेहमीच पैशाच्या आधारावर ठरवले जात नाही. उलट, एखाद्या भेटवस्तूने तुम्ही आनंदित होता किंवा तिच्यामुळे तुमच्या जीवनातील गरज भागवली जाते याचा अर्थ ती भेटवस्तू तुमच्यासाठी मौल्यवान आहे.
२ तुम्ही अपेक्षा करीत असलेल्या सर्व भेटींपेक्षा एक भेट सर्वश्रेष्ठ आहे. ही देवाने मानवजातीला दिलेली भेट आहे. यहोवाने आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत, पण त्याची सर्वश्रेष्ठ भेट त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे खंडणी बलिदान होय. (मत्तय २०:२८) या अध्यायात आपण पाहणार आहोत, की खंडणीची ही भेट तुम्हाला मिळालेली सर्वात मौल्यवान भेट आहे. कारण या भेटीमुळे तुम्हाला अपार आनंद मिळू शकतो आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. यहोवाला तुमच्याबद्दल किती प्रेम आहे याची महान अभिव्यक्ती म्हणजे खंडणी.
खंडणी म्हणजे काय?
३. खंडणी म्हणजे काय, आणि ही भेट मौल्यवान का आहे हे समजण्यासाठी आधी आपण काय समजून घेतले पाहिजे?
३ सरळ शब्दांत सांगायचे तर, खंडणी म्हणजे मानवजातीला पाप आणि इफिसकर १:७) ही बायबल शिकवण समजण्यासाठी आपण एदेन बागेत काय घडले त्यावर विचार करू या. आदामाने पाप केले तेव्हा त्याने काय गमावले हे आपल्याला समजल्यावरच, खंडणी आपल्यासाठी एक मौल्यवान भेट का आहे हे समजू शकेल.
मृत्यूपासून सोडवण्याचा यहोवाचा मार्ग. (४. परिपूर्ण मानवी जीवनामुळे आदामाला काय काय मिळाले?
४ यहोवाने आदामाला निर्माण केले तेव्हा त्याने त्याला जे खरोखर मौल्यवान आहे ते अर्थात परिपूर्ण मानवी जीवन दिले. यामुळे आदामाला काय काय मिळाले? त्याला परिपूर्ण शरीर व मन मिळाल्यामुळे तो कधीच आजारी पडणार नव्हता, कधीही वृद्ध होणार नव्हता आणि मरण पावणार नव्हता. परिपूर्ण मानव या नात्याने त्याचा यहोवा देवाबरोबर एक खास नातेसंबंध होता. बायबल म्हणते, की आदाम “देवाचा पुत्र” होता. (लूक ३:३८) याचा अर्थ, पुत्राचे जसे आपल्या प्रेमळ पित्याबरोबर नाते असते तसेच आदामाचा यहोवा देवाबरोबर घनिष्ट नातेसंबंध होता. यहोवा आपल्या पृथ्वीवरील या पुत्राबरोबर संभाषण करायचा, त्याला त्याने समाधानकारक काम दिले होते आणि आपण काय अपेक्षितो हेही त्याने त्याला सांगितले होते.—उत्पत्ति १:२८-३०; २:१६, १७.
५. आदामाला ‘देवाच्या प्रतिरुपात’ निर्माण करण्यात आले होते असे जेव्हा बायबल म्हणते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो?
५ आदामाला ‘देवाच्या प्रतिरुपात’ निर्माण करण्यात आले होते. (उत्पत्ति १:२७) देवाच्या प्रतिरुपात म्हणजे आदाम देवासारखा दिसत होता असे नाही. आपण या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात शिकलो, की यहोवा अदृश्य आत्मा आहे. (योहान ४:२४) यास्तव, यहोवाचे शरीर रक्तमांसाचे नाही. देवाच्या प्रतिरुपात निर्माण करण्यात आले याचा अर्थ, आदामाला देवाकडे असलेल्या प्रेम, बुद्धी, न्याय व शक्ती या गुणांसहित निर्माण करण्यात आले. आदाम दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण मार्गाने आपल्या पित्यासारखा होता; म्हणजे त्याला इच्छास्वातंत्र्य देण्यात आले होते. यास्तव, आदाम यंत्रमानवासारखा नव्हता. यंत्रमानवाची ज्या कार्यासाठी रचना केलेली असते किंवा ज्या कार्यासाठी त्याला प्रोग्राम केलेले असते फक्त तेवढेच कार्य तो करू शकतो. पण आदाम तसा नव्हता. तो व्यक्तिगत निर्णय घेऊ शकत होता, बरोबर आणि चूक यांत निवड करू शकत होता. त्याने देवाची आज्ञा पाळण्याची निवड केली असती तर तो पृथ्वीवरील परादीसमध्ये अनंतकाळ जगला असता.
६. आदामाने देवाची आज्ञा मोडली तेव्हा त्याने काय गमावले, आणि याचा त्याच्या संततीवर कसा परिणाम झाला?
६ स्पष्टपणे मग, आदामाने जेव्हा देवाची आज्ञा मोडली आणि त्याला मृत्यूची शिक्षा मिळाली तेव्हा त्याला फार मोठी किंमत मोजावी लागली. पाप केल्यामुळे त्याने आपले परिपूर्ण जीवन आणि त्यासोबत मिळणारे सर्व आशीर्वाद गमावले. (उत्पत्ति ३:१७-१९) आणि दुःखाची गोष्ट अशी, की आदामाने केवळ स्वतःचेच नव्हे तर त्याच्या भावी संततीचेही मौल्यवान जीवन गमावले. देवाचे वचन म्हणते: “एका माणसाच्या द्वारे [आदामाच्याद्वारे] पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) होय, आपल्या सर्वांना आदामाकडून वारशाने पाप मिळाले आहे. म्हणूनच बायबल म्हणते, की त्याने स्वतःला आणि त्याच्या संततीला पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वात ‘विकले.’ (रोमकर ७:१४) आदाम आणि हव्वेसाठी कसलीच आशा नव्हती कारण त्यांनी जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडली होती. पण मग त्यांच्या संततीला आणि आपल्यालाही काही आशा नव्हती का?
७, ८. खंडणीचे दोन मूळ अर्थ कोणते?
७ यहोवाने खंडणीद्वारे मानवजातीला वाचवले. खंडणी म्हणजे काय? खंडणीचे दोन अर्थ होतात. एक अर्थ हा, की सोडवणूक करण्यासाठी किंवा पुन्हा विकत घेण्याकरता भरलेल्या किंमतीला खंडणी म्हटले जाते. जसे की, युद्धात कैदी बनवलेल्या सैनिकाला सोडवण्याकरता दिली जाणारी किंमत. आणि दुसरा अर्थ, एखाद्या गोष्टीची भरपाई करणे. जसे की, एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला हानी पोहोचली असेल किंवा इजा झाली असेल तर त्या हानीची भरपाई करण्यासाठी दिली जाणारी किंमत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने अपघात केला तर, झालेल्या हानीच्या किंवा नुकसानीच्या किंमतीच्या समतुल्य असलेली किंमत तिला द्यावी लागेल.
८ मग आदामामुळे आपल्या सर्वांना झालेल्या हानीची भरपाई करून आपल्याला पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून सोडवणे कसे शक्य होणार होते? यहोवाने केलेल्या खंडणीच्या तरतूदीवर आणि या तरतुदीमुळे आपल्यावर काय परिणाम होतो यावर विचार करूया.
यहोवाने खंडणीची तरतूद कशी केली?
९. कोणत्या प्रकारच्या खंडणीची गरज होती?
९ परिपूर्ण मानवी जीवन गमावण्यात आले असल्यामुळे, अपरिपूर्ण मानवी जीवनाने ते पुन्हा विकत घेता येत नव्हते. (स्तोत्र ४९:७, ८) जे गमावण्यात आले होते त्याच्या समतुल्य मुल्याच्या खंडणीची गरज होती. हे देवाच्या वचनात आढळणाऱ्या परिपूर्ण न्यायाच्या संबंधी असलेल्या तत्त्वाच्या सुसंगतेत होते; देवाच्या वचनात म्हटले आहे: “जिवाबद्दल जीव.” (अनुवाद १९:२१) तेव्हा, आदामाने गमावलेल्या परिपूर्ण मानवी जीवाच्या किंवा जीवनाच्या मूल्याची भरपाई कशाने होऊ शकणार होती? समतुल्य मुल्याची खंडणी ठरेल अशा आणखी एका परिपूर्ण जीवनाने.—१ तीमथ्य २:६.
१०. यहोवाने खंडणी कशी पुरवली?
१० यहोवाने ही खंडणी कशी पुरवली? त्याने आपल्या परिपूर्ण आत्मिक पुत्रांपैकी एकाला पृथ्वीवर पाठवले. पण यहोवाने कोणत्याही नव्हे तर आपल्या परमप्रिय, एकुलत्या एका पुत्राला पाठवले. (१ योहान ४:९, १०) या पुत्राने आनंदाने आपले स्वर्गीय निवासस्थान सोडले. (फिलिप्पैकर २:७) या पुस्तकाच्या मागच्या अध्यायात आपण शिकलो, की यहोवाने एका चमत्काराद्वारे आपल्या पुत्राचे जीवन मरीयेच्या गर्भाशयात स्थलांतरीत केले. देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे येशूचा परिपूर्ण मानव म्हणून जन्म झाला. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा लागू होणार नव्हती.—लूक १:३५.
११. केवळ एक मनुष्य संपूर्ण मानवजातीसाठी खंडणी कशी देऊ शकला?
११ पण फक्त एक मनुष्य संपूर्ण मानवजातीसाठी खंडणी कशी देऊ शकला? संपूर्ण मानवजात ज्यांत असंख्य जन सामील होते, ती मुळात पापी कशी झाली? तुम्हाला आठवत असेल, आदामाने पाप करण्याद्वारे परिपूर्ण १ करिंथकर १५:४५) तेव्हा, आपल्याला वाचवण्यासाठी येशूने जणू काय आदामाची जागा घेतली. देवाला पूर्णपणे आज्ञाधारक राहून येशूने आपल्या जीवनाचे बलिदान देऊन आदामाच्या पापांची भरपाई केली. अशाप्रकारे येशूने आदामाच्या संततीला आशा दिली.—रोमकर ५:१९; १ करिंथकर १५:२१, २२.
मानवी जीवनाचा अमूल्य हक्क गमावला. हा हक्क तो आपल्या संततीला देऊ शकला नाही. त्याऐवजी तो फक्त त्यांना पाप आणि मृत्यू देऊ शकला. पण बायबलमध्ये येशूला “शेवटला आदाम” म्हटले आहे. तो परिपूर्ण मानव होता. त्याने कधीच पाप केले नव्हते. (१२. येशूने सहन केलेल्या यातनांवरून काय सिद्ध झाले?
१२ येशूने आपल्या मृत्यूआधी किती यातना भोगल्या त्याचे सविस्तर वर्णन बायबलमध्ये दिले आहे. त्याला चाबकाने जोरदार फटके मारण्यात आले, क्रूरपणे खिळे ठोकण्यात आले आणि यातना खांबावर त्याने एक यातनामय मरण सहन केले. (योहान १९:१, १६-१८, ३०; पृष्ठे २०४-६ वरील परिशिष्ट पाहा) पण येशूला इतक्या यातना का सहन कराव्या लागल्या? या पुस्तकाच्या नंतरच्या एका अध्यायात आपण हे पाहणार आहोत, की कोणताही मानव परीक्षेत यहोवाला विश्वासू राहू शकत नाही, असा दावा सैतानाने केला होता. पण असह्य दुःख होत असतानाही ते विश्वासूपणे सहन करून येशूने सैतानाच्या आव्हानाला चोख उत्तर दिले. दियाबलाने काहीही केले तरी, इच्छास्वातंत्र्य असलेला एक परिपूर्ण मनुष्य देवाशी एकनिष्ठ राहू शकतो, हे येशूने सिद्ध करून दाखवले. आपल्या प्रिय पुत्राच्या विश्वासूपणावर यहोवाला अत्यंत आनंद झाला असेल!—नीतिसूत्रे २७:११.
१३. खंडणी कशाप्रकारे देण्यात आली?
१३ खंडणी कशी देण्यात आली? सा.यु. ३३ सालच्या निसान या यहुदी महिन्याच्या चौदाव्या दिवशी देवाने आपल्या परिपूर्ण व निष्पाप पुत्राचा वध होऊ दिला. अशाप्रकारे येशूने आपले परिपूर्ण मानवी जीवन “एकदाच” अर्पण केले. (इब्री लोकांस १०:१०) येशूच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी, यहोवाने त्याला पुन्हा आत्मिक जीवन देऊन उठवले. स्वर्गात गेल्यावर येशूने आदामाच्या संततीसाठी खंडणी म्हणून बलिदान केलेल्या आपल्या परिपूर्ण मानवी जीवनाचे मूल्य देवाला सादर केले. (इब्री लोकांस ९:२४) यहोवाने येशूच्या बलिदानाचे मूल्य, मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून सोडवण्याकरता लागणारी खंडणी म्हणून स्वीकारले.—रोमकर ३:२३, २४.
खंडणीमुळे तुमच्या जीवनावर होणारा परिणाम
१४, १५. “आपल्या पापांची क्षमा” होण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
१४ आपल्या पापी अवस्थेततही आपण खंडणीमुळे अमूल्य आशीर्वाद प्राप्त करू शकतो. देवाने केलेल्या या महान तरतुदीमुळे सध्या आणि भविष्यात मिळणाऱ्या फायद्यांचा आपण आता विचार करू या.
१५ पापांची क्षमा. वारशाने अपरिपूर्णता मिळाल्यामुळे आपल्याला योग्य ते करण्यासाठी खरोखरच खूप झटावे लागते. आपण एकतर बोलण्यातून किंवा कार्यातून पाप करतोच. पण येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे आपण “आपल्या पापांची क्षमा” मिळवू शकतो. (कलस्सैकर १:१३, १४) परंतु क्षमा मिळण्यासाठी आपण मनापासून पश्चात्ताप केला पाहिजे. आपण नम्रपणे यहोवाला प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या पुत्राच्या खंडणी बलिदानावरील आपल्या विश्वासाच्या आधारावर त्याच्याकडे क्षमेची भीक मागितली पाहिजे.—१ योहान १:८, ९.
१६. कोणत्या गोष्टीमुळे आपण शुद्ध विवेकाने देवाची उपासना करू शकतो आणि अशा विवेकाचे काय मूल्य आहे?
१६ देवासमोर शुद्ध विवेक. दोषी विवेकामुळे आपण सहज निराश होऊ शकतो, आपण काही कामाचे नाही, अशा भावना मनात येऊ शकतात. पण, खंडणीद्वारे क्षमा मिळवून दिल्यामुळे यहोवा दयाळुपणे आपल्याला, आपण अपरिपूर्ण असलो तरी एका शुद्ध विवेकाने त्याची उपासना करू देतो. (इब्री लोकांस ९:१३, १४) यामुळे आपल्याला यहोवाकडे जाण्याची मोकळीक मिळते. आणि आपण मनमोकळेपणाने त्याला प्रार्थना करू शकतो. (इब्री लोकांस ४:१४-१६) शुद्ध विवेकामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते, आपण स्वाभिमान बाळगू शकतो आणि आपल्याला आनंदही मिळतो.
१७. येशू आपल्यासाठी मरण पावल्यामुळे कोणते आशीर्वाद शक्य झाले?
रोमकर ६:२३ म्हणते: “पापाचे वेतन मरण आहे.” तेच वचन पुढे म्हणते: “पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायात आपण पृथ्वीवर येणाऱ्या परादीसात मिळणाऱ्या आशीर्वादांची चर्चा केली होती. (प्रकटीकरण २१:३, ४) येशू आपल्यासाठी मरण पावल्यामुळेच भवितव्यात मिळणारे सर्व आशीर्वाद आणि परिपूर्ण आरोग्यासहित सार्वकालिक जीवन शक्य झाले. तेव्हा हे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर आपण खंडणीबद्दल कृतज्ञता दाखवली पाहिजे.
१७ परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा.तुम्हाला खंडणीबद्दल कदर आहे हे तुम्ही कसे दाखवू शकता?
१८. यहोवाने केलेल्या खंडणीच्या तरतूदीबद्दल आपण त्याचे आभार का मानावेत?
१८ खंडणीबद्दल आपण यहोवाचे मनापासून आभार का मानले पाहिजे? भेट देणारा आपल्यासाठी वेळ, पैसा खर्च करतो, परिश्रम घेतो तेव्हा ती भेटवस्तू अधिक मौल्यवान ठरते. भेट देणाऱ्याला आपल्याबद्दल खरे प्रेम आहे, हे आपल्याला दिसते तेव्हा आपण भारावून जातो. खंडणी ही कोणत्याही भेटीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. कारण ती देण्यासाठी देवाने खूप मोठा त्याग केला. योहान ३:१६ म्हणते: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.” खंडणीवरून यहोवाला आपल्याबद्दल प्रेम असल्याचा उल्लेखनीय पुरावा मिळतो. तसेच, यावरून आपल्याला येशूच्या प्रेमाचा देखील पुरावा मिळतो कारण त्याने स्वखुषीने आपल्यासाठी त्याचे जीवन बहाल केले. (योहान १५:१३) तेव्हा, आपण ही खात्री बाळगली पाहिजे, की यहोवा आणि त्याचा पुत्र येशू यांना आपल्या प्रत्येकावर प्रेम आहे.—गलतीकर २:२०.
१९, २०. देवाने दिलेल्या खंडणीची तुम्हाला कदर आहे हे तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकता?
१९ पण मग, देवाने दिलेल्या खंडणीची तुम्हाला कदर आहे, हे तुम्ही कसे दाखवू शकता? सर्वप्रथम, खंडणी देणाऱ्या यहोवाविषयी आणखी शिकून घ्या. (योहान १७:३) या प्रकाशनाद्वारे बायबलचा अभ्यास करून तुम्हाला असे करता येईल. तुम्ही यहोवाबद्दलचे जसजसे ज्ञान घेत राहाल तसतसे तुमचे त्याच्यावरील प्रेम वाढत राहील. आणि हे प्रेम तुम्हाला त्याला संतुष्ट करणारे कार्य करण्यास प्रवृत्त करेल.—१ योहान ५:३.
२० येशूच्या खंडणी बलिदानावर तुमचा विश्वास आहे हे दाखवा. येशू स्वतः म्हणाला होता: “जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.” (योहान ३:३६) आपला येशूवर विश्वास आहे, हे आपण कसे दाखवू शकतो? आमचा येशूवर विश्वास आहे, असे फक्त बोलून चालणार नाही. याकोब २:२६ म्हणते: “विश्वासहि क्रियांवाचून निर्जीव आहे.” होय, खरा विश्वास तुमच्या ‘क्रियांद्वारे’ सिद्ध होतो. येशूवर आपला विश्वास आहे हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे, केवळ आपल्या शब्दांतूनच नव्हे तर आपल्या कृतींतून त्याचे होता होईल तितके जवळून अनुकरण करणे होय.—योहान १३:१५.
२१, २२. (क) दर वर्षी साजरा केल्या जाणाऱ्या प्रभूच्या सांज भोजन विधीला आपण उपस्थित का राहावे? (ख) अध्याय ६ आणि ७ यांत कोणत्या गोष्टीचे स्पष्टीकरण दिले जाईल?
२१ दर वर्षी साजरा केल्या जाणाऱ्या प्रभूच्या सांज भोजन विधीला उपस्थित राहा. सा.यु. ३३ सालच्या निसान १४ रोजी संध्याकाळी येशूने एका खास सणाची सुरुवात केली. या सणाला बायबलमध्ये “प्रभुभोजन” म्हटले आहे. (१ करिंथकर ११:२०; मत्तय २६:२६-२८) याला ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी असेही म्हटले जाते. येशूने या सणाची सुरुवात, त्याने त्याचे परिपूर्ण मानवी जीवन अर्पण केल्याची आठवण आपल्या प्रेषितांनी व त्यांच्यानंतरच्या ख्रिश्चनांनी ठेवावी म्हणून केली. या सणाविषयी येशूने अशी आज्ञा दिली: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) स्मारकविधी साजरा केल्याने आपल्याला, यहोवा आणि येशू यांनी खंडणीच्या तरतूदीद्वारे दाखवलेल्या महान प्रेमाची आठवण होते. दर वर्षी साजरा केल्या जाणाऱ्या येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहून आपण खंडणीबद्दल आपली कदर व्यक्त करू शकतो. *
२२ यहोवाने केलेली खंडणीची तरतूद खरोखरच सर्वात अमूल्य भेट आहे. (२ करिंथकर ९:१४, १५) या अमूल्य खंडणीचा लाभ, जे मरण पावले आहेत त्यांनाही होऊ शकतो. ते कसे याचे स्पष्टीकरण अध्याय ६ आणि ७ मध्ये दिले आहे.
^ परि. 21 प्रभूभोजनाचा अर्थ काय होतो यावर अधिक माहिती हवी असेल तर पृष्ठे २०६-८ वरील परिशिष्ट पाहा.