पाठ १
यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारचे लोक आहेत?
तुम्ही किती यहोवाच्या साक्षीदारांना ओळखता? आमच्यापैकी काही तुमचे शेजारी असतील तर काही तुमच्यासोबत काम करणारे किंवा तुमचे वर्गसोबती असतील. किंवा तुम्ही आमच्यासोबत बायबल अभ्यास केला असेल. आम्ही नेमके कोण आहोत आणि आम्ही आमचे धार्मिक विश्वास सर्वांना जाहीर रीत्या का सांगतो?
आम्ही तुमच्यासारखेच साधारण लोक आहोत. आम्ही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून व संस्कृतींतून आलो आहोत. आमच्यापैकी काही आधी दुसरा धर्म पाळायचे, तर इतर काहींचा देवावर विश्वास नव्हता. पण यहोवाचे साक्षीदार होण्याआधी आम्ही सर्वांनीच बायबलच्या शिकवणींचे जवळून परीक्षण केले. (प्रेषितांची कृत्ये १७:११) आम्ही जे शिकलो ते आम्हाला पटले आणि त्यानंतर प्रत्येकाने यहोवाची उपासना करण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला.
बायबलचा अभ्यास केल्याने आम्हाला फायदा होतो. इतर लोकांसारखेच आम्हालाही समस्यांना सामोरे जावे लागते आणि स्वतःच्या कमतरतांवर मात करावी लागते. पण बायबल तत्त्वांना आमच्या दैनंदिन जीवनात लागू करण्याचा प्रयत्न केल्याने आमच्या जीवनाचा दर्जा खूप सुधारला आहे. (स्तोत्र १२८:१, २) हे एक कारण आहे ज्यामुळे आम्ही लोकांना बायबलमधून शिकलेल्या चांगल्या गोष्टी सांगतो.
आम्ही देवाच्या मूल्यांनुसार जीवन जगतो. बायबलमध्ये सांगितलेली ही मूल्ये इतरांच्या हिताचा विचार करण्यास व त्यांचा आदर करण्यास शिकवतात. तसेच ती प्रामाणिकपणा व कृपाळू यांसारखे चांगले गुणदेखील निर्माण करतात. समाजात एक चांगले नागरिक बनण्यास आणि कौटुंबिक एकता व नैतिकतेचा उच्च दर्जा ठेवण्यास ही मूल्ये प्रोत्साहन देतात. “देव पक्षपाती नाही” या गोष्टीची खातरी पटल्यामुळे, आम्ही एका आध्यात्मिक बंधुसमाजाचा भाग आहोत जे जाती किंवा देशाच्या कुंपणामुळे विभागलेले नाही. आम्ही साधारण असलो तरीही आमच्यासारखे आम्हीच आहोत.—प्रेषितांची कृत्ये ४:१३; १०:३४, ३५.
-
यहोवाच्या साक्षीदारांमध्ये व इतर लोकांमध्ये काय समानता आहे?
-
बायबलचा अभ्यास केल्यामुळे यहोवाचे साक्षीदार कोणती मूल्ये शिकले आहेत?