व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २३

आमच्या साहित्याचे लिखाण व भाषांतर कसे केले जाते?

आमच्या साहित्याचे लिखाण व भाषांतर कसे केले जाते?

अमेरिकेतील लेखन विभाग

दक्षिण कोरिया

आर्मीनिया

बुरुंडी

श्रीलंका

“प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा” बोलणाऱ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत “सुवार्ता” पोहचवण्यासाठी आम्ही जवळजवळ ७०० भाषांमध्ये साहित्य प्रकाशित करतो. (प्रकटीकरण १४:६) हे मोठे कार्य आम्ही कसे पूर्ण करतो? हे कार्य, जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लेखन विभागात सेवा करणाऱ्यांच्या साहाय्याने व जवळजवळ ३,३०० अनुवादकांच्या साहाय्याने पूर्ण केले जाते. हे कार्य करणारे सर्व जण यहोवाचे साक्षीदार असतात.

मूळ लिखाण इंग्रजीत केले जाते. नियमन मंडळ, आमच्या जागतिक मुख्यालयातील लेखन विभागाच्या कार्याची देखरेख करते. लेखन विभाग, मुख्यालयात तसेच विशिष्ट शाखा कार्यालयांत लेखन करणाऱ्यांच्या कार्याचे संयोजन करतो. लेखन करणारे जगातील वेगवेगळ्या भागांतील असल्यामुळे वेगवेगळ्या देशांतील लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर लेखन करणे शक्य होते आणि त्यामुळे अनेक देशांतील लोक आमची प्रकाशने आवडीने वाचतात.

हे लिखाण अनुवादकांना पाठवले जाते. इंग्रजीतील लिखाण तपासल्यानंतर ते इंटरनेटद्वारे जगभरातील अनुवादकांच्या गटांना पाठवले जाते. निरनिराळ्या भाषा-गटांत काम करणारे हे अनुवादक पाठवलेल्या लिखाणाचे भाषांतर करतात व ते वाचून तपासतात. इंग्रजी लिखाणाचा अचूक अर्थ आपल्या भाषेत मांडण्यासाठी ते योग्य शब्द वापरण्याचा प्रयत्न करतात.—उपदेशक १२:१०.

कम्प्यूटरच्या उपयोगामुळे हे कार्य जलद गतीने केले जाते. मानवी लेखक व अनुवादक जे काम करू शकतात ते कम्प्यूटर करू शकत नसले, तरी कम्प्यूटरवरील शब्दकोशांचा, भाषेशी संबंधित प्रोग्रामचा आणि संशोधन साधनांचा उपयोग केल्यामुळे हे कार्य जलद गतीने केले जाते. यहोवाच्या साक्षीदारांनी मल्टिलँग्वेज इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग सिस्टम (MEPS) नावाचा एक प्रोग्राम तयार केला आहे; या प्रोग्रामद्वारे शेकडो भाषांमध्ये अनुवाद करणे, लेखात चित्र टाकणे आणि छपाईसाठी साहित्य तयार करणे शक्य होते.

केवळ हजारएक लोक बोलत असलेल्या भाषांमध्येसुद्धा साहित्य प्रकाशित करण्यासाठी आम्ही इतकी मेहनत का घेतो? कारण “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” अशी यहोवाची इच्छा आहे.—१ तीमथ्य २:३, ४.

  • आमच्या साहित्याचे लेखन कसे केले जाते?

  • आम्ही अनेक भाषांमध्ये आमच्या साहित्याचे भाषांतर का करतो?