स्तोत्रं १२०:१-७

  • एक विदेशी शांतीची आशा धरतो

    • “फसवणाऱ्‍या जीभेपासून वाचव” ()

    • “मी शांतिप्रिय आहे” ()

चढणीचं गीत.* १२०  मी माझ्या संकटात यहोवाला हाक मारली,+आणि त्याने मला उत्तर दिलं.+  २  हे यहोवा, मला* खोटं बोलणाऱ्‍या ओठांपासून आणि फसवणाऱ्‍या जिभेपासून वाचव.  ३  अगं फसवणाऱ्‍या जिभे!+ तो तुझं काय करेल? तुला कोणती शिक्षा देईल?  ४  योद्ध्याच्या तीक्ष्ण बाणांनी+आणि जळत्या निखाऱ्‍यांनी+ तो तुला शिक्षा देईल.  ५  हाय हाय! मी मेशेखमध्ये+ विदेशी म्हणून राहिलो;मी केदारमधल्या+ तंबूंमध्ये राहिलो.  ६  शांतीचा द्वेष करणाऱ्‍यांसोबत,मी खूप काळ राहिलो.+  ७  मी शांतिप्रिय आहे; पण जेव्हा मी बोलतो,तेव्हा ते युद्ध करायला येतात.

तळटीपा

किंवा “माझा जीव.”