स्तोत्रं १२७:१-५

  • देवाशिवाय सर्वकाही व्यर्थ आहे

    • “जर यहोवाने घर बांधलं नाही” ()

चढणीचं गीत. शलमोनचं स्तुतिगीत. १२७  जर यहोवाने घर बांधलं नाही,तर बांधकाम करणाऱ्‍यांची मेहनत व्यर्थ आहे.+ जर यहोवाने शहराचं रक्षण केलं नाही,+तर पहारेकऱ्‍यांचं जागं राहणं व्यर्थ आहे.  २  तुम्ही लवकर उठता,आणि उशिरापर्यंत जागूनअन्‍न मिळवण्यासाठी धडपड करता, हेही व्यर्थच आहे. कारण तो आपल्या प्रिय सेवकांच्या गरजा भागवतो;तो त्यांना चांगली झोपही देतो.+  ३  पाहा! मुलं* यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत;+पोटचं फळ देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे.+  ४  तरुणपणी झालेली मुलं,शूरवीराच्या हातातल्या बाणांसारखी असतात.+  ५  ज्याचा भाता अशा बाणांनी भरलेला असतो, तो माणूस सुखी आहे!+ त्यांना* लज्जित व्हावं लागणार नाही. कारण शहराच्या फाटकांत ती* शत्रूंशी बोलतील.

तळटीपा

किंवा “पुत्र.”
हे कदाचित मुलांच्या वडिलांना सूचित करत असावं.
हे कदाचित मुलांना सूचित करत असावं.