स्तोत्रं ३७:१-४०

  • यहोवावर भरवसा ठेवणारे समृद्ध होतील

    • “दुष्ट माणसांमुळे संतापू नकोस” ()

    • “यहोवालाच आपला सर्वात मोठा आनंद मान” ()

    • “आपला मार्ग यहोवाच्या हाती सोपवून दे” ()

    • “नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल” (११)

    • नीतिमानाला अन्‍नासाठी भीक मागावी लागणार नाही (२५)

    • नीतिमान पृथ्वीवर सर्वकाळ राहतील (२९)

दावीदचं गीत. א [आलेफ ] ३७  दुष्ट माणसांमुळे संतापू नकोसकिंवा दुर्जनांचा हेवा करू नकोस.+  २  ते पाहता पाहता गवतासारखे सुकून जातील+आणि कोवळ्या, हिरव्यागार गवतासारखे कोमेजून जातील. ב [बेथ ]  ३  यहोवावर भरवसा ठेव आणि चांगलं ते कर;+देशात* राहा आणि विश्‍वासूपणे वाग.+  ४  यहोवालाच आपला सर्वात मोठा आनंद मान,म्हणजे तो तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल. ג [गिमेल ]  ५  आपला मार्ग यहोवाच्या हाती सोपवून दे;+त्याच्यावर विसंबून राहा, म्हणजे तो तुझ्या वतीने कार्य करेल.+  ६  तो तुझं नीतिमत्त्व पहाटेच्या प्रकाशासारखंआणि तुझा न्याय दुपारच्या उन्हासारखा चमकू देईल. ד [दालेथ ]  ७  यहोवापुढे शांत राहा+आणि आतुरतेने* त्याची वाट पाहा. आपल्या दुष्ट योजना सफल करणाऱ्‍या माणसामुळेसंतापू नकोस.+ ה [हे ]  ८  राग सोडून दे आणि क्रोध झटकून टाक;+संतापाच्या भरात वाईट गोष्टी करू नकोस.*  ९  कारण दुष्ट लोकांचा नाश होईल,+पण जे यहोवाची आशा धरतात त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.+ ו [वाव ] १०  थोड्याच काळाने दुष्ट लोक नाहीसे होतील;+त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी तू त्यांना शोधलंस,तरी ते तुला सापडणार नाहीत.+ ११  पण नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल,+भरपूर शांती असल्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.+ ז [झाइन ] १२  दुष्ट माणूस नीतिमानाविरुद्ध षड्यंत्र करतो;+तो त्याच्यावर दातओठ खातो. १३  पण यहोवा त्या दुष्टावर हसेल,कारण त्याच्या नाशाचा दिवस येणार, हे त्याला माहीत असतं.+ ח [हेथ ] १४  दीनदुबळ्यांना आणि गोरगरिबांना खाली पाडण्यासाठी;सरळ मार्गाच्या लोकांची कत्तल करण्यासाठी,दुष्ट आपल्या तलवारी उपसतात आणि आपली धनुष्यं ताणतात. १५  पण त्यांची तलवार त्यांच्याच हृदयात शिरेल;+त्यांची धनुष्यं मोडून टाकली जातील. ט [तेथ ] १६  नीतिमानाजवळ थोडं थोडकंच असलं,तरी बऱ्‍याच दुष्ट लोकांच्या समृद्धीपेक्षा ते चांगलं आहे.+ १७  कारण दुष्टांचे हात तोडून टाकले जातील,पण नीतिमानांना यहोवा आधार देईल. י [योद ] १८  निर्दोष माणसांच्या परिस्थितीची* यहोवाला जाणीव असते,त्यांचा वारसा सर्वकाळ टिकून राहील.+ १९  संकटाच्या काळात त्यांना लज्जित व्हावं लागणार नाही;दुष्काळातही त्यांच्याजवळ भरपूर अन्‍न असेल. כ [खाफ ] २०  पण दुष्टांचा नाश होईल;+यहोवाचे शत्रू कुरणांतल्या हिरव्यागार गवतासारखे सुकून जातील;ते धुरासारखे नाहीसे होतील. ל [लामेद ] २१  दुष्ट माणूस उसनं घेऊन परत देत नाही,पण नीतिमान माणूस मोठ्या मनाचा* आणि उदार असतो.+ २२  देव ज्यांना आशीर्वाद देतो त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल,पण तो ज्यांना शाप देतो त्यांचा नाश होईल.+ מ [मेम ] २३  यहोवाला एखाद्या माणसाच्या वागणुकीमुळे आनंद होतो,+तेव्हा तो त्याच्या पावलांना वाट दाखवतो.*+ २४  असा माणूस अडखळला, तरी जमिनीवर आपटणार नाही,+कारण यहोवा आपल्या हाताने त्याला सावरेल.+ נ [नून ] २५  मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय,पण आजपर्यंत मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं,+किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्‍नासाठी* भीक मागत असलेलं पाहिलं नाही.+ २६  तो गरजूंना नेहमी उदारपणे मदत करतो,+त्याच्या मुलाबाळांना देवाकडून आशीर्वाद मिळतात. ס [सामेख ] २७  वाइटापासून फिरून चांगलं ते कर,+म्हणजे तू सर्वकाळ टिकून राहशील. २८  कारण यहोवा न्यायप्रिय आहे,तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना सोडून देणार नाही.+ ע [आयन ] ते नेहमी सुरक्षित राहतील;+पण, दुष्टांच्या वंशजांचा नाश केला जाईल.+ २९  नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल,+आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.+ פ [पे ] ३०  नीतिमान माणसाच्या तोंडून बुद्धीचे बोल निघतात,*त्याची जीभ न्यायाबद्दल सांगते.+ ३१  देवाचं नियमशास्त्र त्याच्या हृदयात असतं.+ त्याची पावलं कधीही अडखळणार नाहीत.+ צ [सादे ] ३२  दुष्ट माणूस नीतिमानावर टपलेला असतो,त्याचा जीव घेण्याची तो संधी शोधत असतो. ३३  पण यहोवा नीतिमानाला त्याच्या हाती देणार नाही;+न्याय करताना तो नीतिमानाला दोषी ठरवणार नाही.+ ק [खुफ ] ३४  यहोवाची आशा धर आणि त्याच्या मार्गावर चाल,म्हणजे तो तुझा गौरव करून तुला पृथ्वीचा वारसा देईल. दुष्टांचा नाश होईल,+ तेव्हा तू पाहशील.+ ר [रेश ] ३५  मी दुष्ट आणि क्रूर माणसाला,आपल्या मातीत जोमाने वाढणाऱ्‍या हिरव्यागार झाडासारखं बहरताना पाहिलंय.+ ३६  पण तो अचानक गेला आणि कायमचा नाहीसा झाला;+मी त्याला शोधत राहिलो, तरी तो सापडला नाही.+ ש [शिन ] ३७  निर्दोष माणसाकडे* लक्ष देआणि सरळ मनाच्या माणसाला+ पाहा,कारण त्याला भविष्यात शांती लाभेल.+ ३८  पण सर्व अपराध्यांचा नाश केला जाईल;दुष्टांच्या भविष्याचा अंत होईल.+ ת [ताव ] ३९  यहोवा नीतिमानांचं तारण करतो;+संकटाच्या काळात तो त्यांचा दुर्ग होतो.+ ४०  यहोवा त्यांना साहाय्य करेल आणि त्यांची सुटका करेल.+ त्यांना दुष्टांच्या हातून सोडवून, तो त्यांचा बचाव करेल,कारण ते त्याचा आश्रय घेतात.+

तळटीपा

किंवा “पृथ्वीवर.”
किंवा “धीराने.”
किंवा कदाचित, “संतापू नकोस, कारण त्यामुळे वाईटच परिणाम होईल.”
शब्दशः “निर्दोष माणसांच्या दिवसांची.”
किंवा “कृपाळू.”
किंवा “स्थिर करतो.”
किंवा “भाकरीसाठी.”
किंवा “नीतिमान माणूस हळू आवाजात बुद्धीच्या गोष्टी बोलतो.”
किंवा “खरेपणाने चालणाऱ्‍याकडे.”