स्तोत्रं ७२:१-२०

  • देवाच्या राजाच्या शासनकाळात शांती

    • “नीतिमानांची भरभराट होईल” ()

    • एका समुद्रापासून दुसऱ्‍या समुद्रापर्यंत प्रजा ()

    • हिंसेपासून सुटका (१४)

    • पृथ्वीवर अन्‍नधान्याची रेलचेल (१६)

    • देवाच्या नावाची सर्वकाळ स्तुती (१९)

शलमोनबद्दल. ७२  हे देवा, राजाला तुझे न्याय-निर्णय कळव;त्याला* तुझ्या नीतीबद्दल शिकव.+  २  तो तुझ्या लोकांचं नीतीने समर्थन करोआणि तुझ्या गोरगरिबांचा योग्य न्याय करो.+  ३  पर्वत लोकांना शांती देवोतआणि टेकड्या नीती आणोत.  ४  त्याने लोकांमधल्या दीनदुबळ्यांचं समर्थन करावं.* गोरगरिबांच्या मुलाबाळांना वाचवावं,आणि फसवणूक करणाऱ्‍याला चिरडून टाकावं.+  ५  हे देवा, जोपर्यंत सूर्य आहे,आणि जोपर्यंत चंद्र राहील,तोपर्यंत तुझे लोक पिढ्या न्‌ पिढ्या तुझं भय मानतील.+  ६  तो कापलेल्या गवतावर पडणाऱ्‍या पावसाप्रमाणेआणि पृथ्वीवर बरसणाऱ्‍या सरींप्रमाणे असेल.+  ७  त्याच्या शासनकाळात नीतिमानांची भरभराट होईल,*+आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल.+  ८  एका समुद्रापासून दुसऱ्‍या समुद्रापर्यंतआणि नदीपासून* पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत त्याची प्रजा असेल.*+  ९  वाळवंटात राहणारे राजाला नमन करतील,आणि तो आपल्या शत्रूंना धूळ चारेल.+ १०  तार्शीशचे आणि बेटांचे राजे नजराणे आणतील.+ शबाचे आणि सबाचे राजे भेटी घेऊन येतील.+ ११  सर्व राजे त्याला नमन करतील,आणि सगळी राष्ट्रं त्याची सेवा करतील. १२  कारण साहाय्यासाठी हाक मारणाऱ्‍या गरिबांची;दीनदुबळ्या आणि असाहाय्य लोकांची तो सुटका करेल. १३  दीनदुबळ्यांवर आणि गरिबांवर तो दया करेल;गोरगरिबांचे जीव तो वाचवेल. १४  तो त्यांची अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल. त्यांचं रक्‍त त्याच्या नजरेत मौल्यवान असेल. १५  त्याला मोठं आयुष्य लाभो आणि त्याला शबाचं सोनं दिलं जावो.+ लोक सतत त्याच्यासाठी प्रार्थना करोत,आणि त्याला दिवसभर आशीर्वाद देवोत. १६  पृथ्वी भरपूर उपज देईल;+पर्वतांच्या शिखरांवरही पुष्कळ धान्य उगवेल. लबानोनच्या पिकासारखं राजाचं पीक असेल,+आणि शहरांमध्ये लोक जमिनीवरच्या गवतासारखे वाढतील.+ १७  त्याचं नाव सर्वकाळ राहो,+सूर्य असेपर्यंत त्याची भरभराट होवो. लोक त्याच्या नावाने एकमेकांना आशीर्वाद देवोत;+सर्व राष्ट्रं त्याला धन्य म्हणोत! १८  इस्राएलचा देव यहोवा याची स्तुती असो!+ तोच अद्‌भुत कार्यं करतो.+ १९  त्याच्या गौरवशाली नावाची सर्वकाळ स्तुती होवो!+ त्याच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी भरून जावो!+ आमेन, आमेन. २०  इशायचा मुलगा दावीद+ याच्या प्रार्थना इथे संपतात.

तळटीपा

शब्दशः “राजाच्या मुलाला.”
शब्दशः “न्याय करावा.”
शब्दशः “कोंब फुटतील.”
किंवा “तो राज्य करेल.”
म्हणजे, फरात नदी.