देवाच्या वचनाबद्दल थोडी माहिती
बायबलमध्ये देवाचा संदेश आहे. तो आपल्यासाठी आहे. आपण जीवनात यशस्वी कसं होऊ शकतो आणि देवाचं मन आनंदित कसं करू शकतो हे त्यात सांगितलं आहे. बायबल आपल्याला या प्रश्नांची उत्तरही देतं:
बायबलमध्ये वचनं कशी शोधायची?
बायबल हे ६६ पुस्तकांनी मिळून बनलं आहे. त्याचे दोन भाग आहेत: हिब्रू-ॲरामेईक शास्त्र (“जुना करार”) आणि ग्रीक शास्त्र (“नवा करार”). बायबलच्या प्रत्येक पुस्तकात अध्याय आणि अध्यायांत वचनं आहेत. एखाद्या वचनाचा उल्लेख केला जातो, तेव्हा पुस्तकाच्या नावानंतरची पहिली संख्या अध्यायाला सूचित करते आणि त्यानंतरची संख्या वचनाला किंवा वचनांना सूचित करते. जसं की, उत्पत्ती १:१ म्हणजे उत्पत्ती पुस्तकातल्या १ ल्या अध्यायातलं १ लं वचन.