प्रश्न १८
तुम्ही देवासोबत जवळचं नातं कसं जोडू शकता?
“हे प्रार्थना ऐकणाऱ्या देवा, सर्व प्रकारचे लोक तुझ्याजवळ येतील.”
“यहोवावर अगदी मनापासून भरवसा ठेव आणि स्वतःच्या समजशक्तीवर अवलंबून राहू नकोस. तुझ्या सर्व कार्यांत त्याची आठवण ठेव, म्हणजे तो तुझे मार्ग मोकळे करेल.”
“सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी त्यांनी एकाच खऱ्या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखणं गरजेचं आहे.”
“मुळात, देव आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.”
“मी सतत हीच प्रार्थना करतो, की तुमचं प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत राहावं आणि तुम्हाला सत्याचं अचूक ज्ञान आणि पूर्ण समज मिळावी.”
“तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी म्हणजे त्याला ती दिली जाईल. कारण देव कोणालाही कमी न लेखता सगळ्यांना उदारपणे बुद्धी देतो.”
“देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अरे पापी लोकांनो, आपले हात स्वच्छ करा; अरे चंचल वृत्तीच्या लोकांनो, आपली मनं शुद्ध करा.”
“देवावर प्रेम करण्याचा अर्थच असा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचं पालन करावं आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”