व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ५

बायबलचा मुख्य संदेश काय आहे?

“मी तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या संततीमध्ये व तिच्या संततीमध्ये शत्रुत्व निर्माण करीन. तो तुझं डोकं ठेचेल आणि तू त्याच्या टाचेवर घाव करशील.”

उत्पत्ती ३:१५

“तुझ्या संततीमुळे पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल, कारण तू माझं ऐकलं आहेस.”

उत्पत्ती २२:१८

“तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.”

मत्तय ६:१०

“शांती देणारा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायांखाली चिरडून टाकेल.”

रोमकर १६:२०

“सगळ्या गोष्टी मुलाच्या अधीन केल्या जातील, तेव्हा ज्याने सगळ्या गोष्टी त्याच्या अधीन केल्या, त्याला मुलगाही अधीन होईल. हे यासाठी, की देवाने सगळ्यांसाठी सर्वकाही व्हावं.”

१ करिंथकर १५:२८

“जी अभिवचनं देण्यात आली होती, ती अब्राहामला आणि त्याच्या संततीला देण्यात आली होती . . . तो ख्रिस्त आहे. शिवाय, जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तर तुम्ही खरोखर अब्राहामची संतती आणि त्याला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे वारस आहात.”

गलतीकर ३:१६, २९

“जगाचं राज्य आता आपल्या प्रभूचं आणि त्याच्या ख्रिस्ताचं झालं आहे, आणि तो सदासर्वकाळ राजा म्हणून राज्य करेल.”

प्रकटीकरण ११:१५

“त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवणाऱ्‍या त्या मोठ्या अजगराला, म्हणजेच दियाबल आणि सैतान म्हटलेल्या त्या जुन्या सापाला खाली फेकण्यात आलं. त्याला पृथ्वीवर फेकून देण्यात आलं आणि त्याच्यासोबत त्याच्या दूतांनाही फेकण्यात आलं.”

प्रकटीकरण १२:९

“त्याने दियाबल आणि सैतान म्हटलेल्या अजगराला, म्हणजे त्या जुन्या सापाला धरलं आणि त्याला १,००० वर्षांसाठी बांधून ठेवलं.”

प्रकटीकरण २०:२