प्रश्न ६
मसीहाबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं होतं?
भविष्यवाणी
“तू, हे बेथलेहेम एफ्राथा, . . . तुझ्यातून माझ्यासाठी असा एक जण येईल, जो इस्राएलचा शासक बनेल.”
पूर्णता
“हेरोद राजाच्या काळात यहूदीयातल्या बेथलेहेममध्ये येशूचा जन्म झाला. त्याच्या काही काळानंतर पूर्वेकडचे काही ज्योतिषी यरुशलेमला आले.”
भविष्यवाणी
“ते माझी वस्त्रं आपसात वाटून घेतात, आणि माझ्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकतात.”
पूर्णता
“मग येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर शिपायांनी त्याचे कपडे घेतले आणि त्यांचे चार भाग करून . . . आपसात वाटून घेतले . . . पण आतला झगा शिवलेला नव्हता, तर वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले: ‘हा झगा फाडण्याऐवजी, तो कोणाला मिळावा हे ठरवायला आपण चिठ्ठ्या टाकू या.’”
भविष्यवाणी
“त्याच्या सगळ्या हाडांचं तो रक्षण करतो; त्यांतलं एकही मोडण्यात आलं नाही.”
पूर्णता
“ते येशूच्या जवळ आले, तेव्हा तो आधीच मेला आहे असं त्यांना दिसलं. म्हणून त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत.”
भविष्यवाणी
“आमच्या अपराधांसाठी त्याला भोसकलं गेलं.”
पूर्णता
“एका शिपायाने त्याच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा लगेच रक्त आणि पाणी बाहेर आलं.”
भविष्यवाणी
“त्यांनी मला माझी मजुरी म्हणून चांदीचे ३० तुकडे दिले.”
पूर्णता
“मग त्या १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत नावाचा एक जण मुख्य याजकांकडे गेला आणि म्हणाला: ‘जर मी त्याला पकडून दिलं तर तुम्ही मला काय द्याल?’ ते त्याला चांदीची ३० नाणी द्यायला तयार झाले.”