गीत १९
नंदनवन—देवाचे अभिवचन
१. वचन हे दिले याहाने,
‘करेन मी सारे नवे!’
दुःखे सारी जाता विरुनी,
वसेल सुख चोहीकडे.
(कोरस)
ते नंदनवन पृथ्वीवरी
येईल पाहा खरोखरी,
ख्रिस्त करील शब्द पुरे
यहोवाचे आनंदाने.
२. दिवस तो ना दूर आता,
दुरावले जे प्रियजन
ऐकुनी साद राजा येशूची
झुगारतील मृत्युबंधन!
(कोरस)
ते नंदनवन पृथ्वीवरी
येईल पाहा खरोखरी,
ख्रिस्त करील शब्द पुरे
यहोवाचे आनंदाने.
३. राजा दिला आम्हा तू याहा,
ख्रिस्त आरूढ राजासनी!
मानू आभार तुझे यहोवा,
स्वीकार तू आमची स्तुती!
(कोरस)
ते नंदनवन पृथ्वीवरी
येईल पाहा खरोखरी,
ख्रिस्त करील शब्द पुरे
यहोवाचे आनंदाने.
(मत्त. ५:५; ६:१०; योहा. ५:२८, २९ देखील पाहा.)