१८-२४ मार्च
स्तोत्रं १९-२१
गीत ११ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. “आकाश देवाच्या गौरवाचं वर्णन करतं”
(१० मि.)
यहोवाची सृष्टी त्याचा गौरव करते (स्तो १९:१; टेहळणी बुरूज०४ १/१ ८ ¶१-२)
यहोवाने अद्भुत रितीने सूर्याची निर्मिती केली आहे (स्तो १९:४-६; टेहळणी बुरूज०४ ६/१ १०-११ ¶८-१०)
आपण देवाने निर्माण केलेल्या गोष्टीतून शिकलं पाहिजे (मत्त ६:२८; सावध राहा!९५-E ११/८ ७ ¶३)
कौटुंबिक उपासनेसाठी एक कल्पना: सृष्टीचं निरीक्षण करा आणि मग त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं यावर चर्चा करा.
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
स्तो १९:७-९—ही वचनं हिब्रू कवितांच्या खास पद्धतीची उदाहरणं आहेत असं का म्हणता येईल? (इन्साइट-१ १०७३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो १९:१-१४ (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी
(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. एखाद्याला स्मारकविधीचं आमंत्रण द्या आणि jw.org चा वापर करून समोरच्या व्यक्तीला जवळ असलेलं स्मारकविधीचं ठिकाण शोधा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ३)
५. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. कोणीतरी दारात ठेवून गेलेली आमंत्रणपत्रिका पाहून स्मारकविधीला आलेल्या व्यक्तीचं स्वागत करा. त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची व्यवस्था करा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)
६. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(५ मि.) भाषण. सहसा विचारले जाणारे प्रश्न ४५—विषय: यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात? (शिकवणे अभ्यास ६)
गीत १४१
७. सृष्टीतल्या गोष्टी पाहून आपला विश्वास वाढवा
(१५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
सृष्टीतल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे निर्माणकर्त्यावरचा तुमचा विश्वास कसा वाढतो?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. ७ ¶९-१३, पान ५६ वरची चौकट