जागे राहा!
तुम्ही कोणावर भरवसा ठेवू शकता?—बायबल काय म्हणतं?
जे भरवशालायक आहेत असं मानलं जातं तेच जेव्हा भरवसा तोडतात, तेव्हा लोक निराश आणि हताश होतात. आज अशा प्रकारच्या लोकांवरून अनेकांचा विश्वास उडालाय. यांमध्ये . . .
लोकांच्या गरजांपेक्षा स्वतःचा स्वार्थ पाहणारे राजकीय नेते आहेत.
निष्पक्ष न राहता, अर्धसत्य किंवा अर्धवट माहिती देणारे न्यूज चॅनल आणि इतर प्रसार माध्यमं आहेत.
लोकांच्या हिताचा विचार न करणारे शास्त्रज्ञ आहेत.
लोकांचा देवाधर्मावरचा विश्वास वाढवण्याऐवजी, राजकारणामध्ये आणि राजकीय गोष्टींमध्ये जास्तीत जास्त गुंतलेले धार्मिक पुढारी आहेत.
त्यामुळे, लोक आजकाल एखाद्यावर लगेच भरवसा का ठेवत नाहीत हे आपण समजू शकतो. बायबलमध्येही म्हटलं आहे:
“माणसावर भरवसा ठेवू नका, कारण तो तारण करू शकत नाही.”—स्तोत्र १४६:३, नवे जग भाषांतर.
तुम्ही पूर्ण भरवसा ठेवू शकता अशी व्यक्ती
तुम्ही कोणावर पूर्णपणे भरवसा ठेवू शकता याबद्दल बायबलमध्ये सांगितलंय. ती व्यक्ती म्हणजे: येशू ख्रिस्त. तो फक्त अनेक शतकांपूर्वी होऊन गेलेला एक चांगला माणूस नव्हता, तर स्वतः देवाने त्याला राज्य करायला नियुक्त केलंय. बायबलमध्ये त्याच्याबद्दल म्हटलंय: “तो राजा म्हणून . . . राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) येशू देवाच्या राज्याचा राजा आहे. आणि देवाचं हे राज्य आत्ताही स्वर्गातून राज्य करत आहे.—मत्तय ६:१०.
तुम्ही येशू ख्रिस्तावर का भरवसा ठेवू शकता याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी “देवाच्या राज्याचा राजा कोण आहे?” आणि “देवाचं राज्य कोणकोणत्या गोष्टी करेल?” हे दोन लेख वाचा.