जागे राहा!
टर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंप—बायबल काय म्हणतं?
६ फेब्रुवारी २०२३ ला टर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे मोठे हादरे बसले. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.
“सोमवारी झालेल्या मोठ्या भूकंपामुळे टर्की आणि उत्तर-पश्चिम सीरियाच्या भागांमध्ये ३७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हजारो जण जखमी झाले, तर कित्येक बेघर झाले. शिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.”—रॉयटर्स, ६ फेब्रुवारी २०२३.
अशा दुर्घटना घडतात तेव्हा आम्हाला खूप दुःख होतं. अशा वेळी “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव” यहोवा आपल्याला दिलासा देऊ शकतो. (२ करिंथकर १:३) तो बायबलमधून आपल्याला “धीर धरायला” मदत करतो आणि “सांत्वन” देतो.—रोमकर १५:४.
बायबलमधून आपल्याला कळतं, की:
भूकंपांबद्दल आधीच काय सांगण्यात आलं होतं.
आपल्याला सांत्वन आणि आशा कशी मिळू शकते.
देव सर्व दुःख आणि त्रास कसं काढून टाकेल.
यांबद्दल बायबल काय म्हणतं हे जाणून घेण्यासाठी हे लेख वाचा:
a बायबलमध्ये देवाचं नाव ‘यहोवा’ असं दिलं आहे.—स्तोत्र ८३:१८.