जागे राहा!
सोशल मिडियामुळे तुमच्या मुलांचं नुकसान होतंय का?—बायबलमुळे आईवडिलांना कशी मदत होऊ शकते?
“लहान मुलांचं मानसिक आरोग्य बिघडण्याची समस्या वाढत चालली आहे. आणि आम्हाला असं दिसून आलंय, की याचं मुख्य कारण सोशल मिडिया आहे.”—डॉ. विवेक मूर्थी, सर्जन जनरल अमेरिका, न्यू यॉर्क टाईम्स, १७ जून, २०२४.
आईवडील सोशल मिडियाच्या धोक्यांपासून आपल्या मुलांचं संरक्षण कसं करू शकतात? याबद्दल बायबलमध्ये व्यावहारिक सल्ला मिळतो.
आईवडील काय करू शकतात?
या बायबल तत्त्वांचा विचार करा.
“शहाणा माणूस विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो.”—नीतिवचनं १४:१५.
सोशल मिडियाच्या धोक्यांमुळे असा विचार करू नका, की तुमच्या मुलांना ते कधी वापरूच द्यायचं नाही. मुलांना सोशल मिडियाचा वापर करू देण्याआधी तुम्ही काही गोष्टींची खातरी करून घेऊ शकता. त्या म्हणजे, सोशल मिडिया किती वेळ वापरायचं याबद्दल तुम्ही घालून दिलेले नियम ती पाळतील, चांगली मैत्री टिकवून ठेवतील आणि वाईट गोष्टी बघणार नाहीत.
जास्त माहितीसाठी, “शुड माय चाइल्ड युज सोशल मिडिया?” आणि “टिचिंग युअर टिनएजर सोशल मिडिया सेफटी” हे इंग्रजीतले लेख वाचा.
“वेळेचा चांगला उपयोग करा.”—इफिसकर ५:१६.
जर तुम्ही तुमच्या मुलांना सोशल मिडिया वापरू देत असाल तर ते कसं वापरायचं याबद्दल त्यांना नियम घालून द्या. आणि ते त्यांच्या फायद्याचे कसे आहेत हे त्यांना समजावून सांगा. तुमच्या मुलांच्या वागण्यात काही बदल दिसून येत असतील तर कदाचित सोशल मिडियाच्या त्यांच्या वापरावर तुम्हाला काही बंधनं घालावी लागतील.
सोशल मिडिया वापरताना काही बंधनं असणं का फायद्याचं आहे हे मुलांना समजावून सांगण्यासाठी सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा हे बोर्डवरचं कार्टून वापरा.
जास्त माहितीसाठी
बायबल म्हणतं, की आज आपण ‘खूप कठीण काळात’ जगतोय. (२ तीमथ्य ३:१-५) असं असलं तरी, त्यातल्या व्यावहारिक सल्ल्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. नौजवानों में बढ़ती मायूसी और निराशा या हिंदीतल्या लेखात बायबलवर आधारित आणखी २० लेखांची नावं सापडतील. या लेखांमुळे आईवडिलांना आणि मुलांना मदत होऊ शकते.